मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime: कुख्यात सूरज ठोंबरे टोळीवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : खुनाचा बदला घेण्यासाठी शिवाजीनगर न्यायालय परिसरात प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या आरोपावरून कुख्यात सूरज ठोंबरे आणि त्याच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कुख्यात सूरज ठोंबरे टोळीवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई
कुख्यात सूरज ठोंबरे टोळीवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई

Pune Crime : खुनाचा बदला घेण्यासाठी शिवाजीनगर कोर्ट परिसरात सशस्त्र हल्ल्याच्या तयारीचा आरोप; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : खुनाचा बदला घेण्यासाठी शिवाजीनगर न्यायालय परिसरात प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या आरोपावरून कुख्यात सूरज ठोंबरे आणि त्याच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या टोळीविरुद्ध मकोकाचा प्रस्ताव सादर केला होता.पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज ठोंबरे याच्या टोळीतील सदस्याचा २६ ऑगस्ट २०२६ रोजी खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळीतील सदस्य शिवाजीनगर कोर्ट परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान त्यांच्याकडून अग्निशस्त्रासह शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

या प्रकरणात वेदांत रोहित सावंत (वय २१), अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१), धिरज लखारा (वय २४), सूरज आशिष ठोंबरे (वय २४) आणि मानव शरद कमाले (वय २४) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, टोळीतील सदस्यांविरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, शस्त्राचा धाक दाखवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, मारामारी, दहशत निर्माण करणे आणि फौजदारी कट रचणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय शस्त्र अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीच्या कथित संघटित गुन्हेगारी कारवायांचा विचार करून मकोकाच्या कलमांचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २६ ऑगस्ट रोजी मान्यता देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्यासह भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा