मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sunil Shelke Murder Update : आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास आता एसआयटीकडे; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष पथकाची केली स्थापना

•पावसाळी अधिवेशनातील मागणीनंतर राज्य शासनाचे आदेश; नऊ पिस्तूल आणि 42 काडतुसे जप्त प्रकरणात अतिरिक्त तपास

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sunil Shelke Murder Update : आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास आता एसआयटीकडे; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष पथकाची केली स्थापना

•पावसाळी अधिवेशनातील मागणीनंतर राज्य शासनाचे आदेश; नऊ पिस्तूल आणि 42 काडतुसे जप्त प्रकरणात अतिरिक्त तपास

पिंपरी-चिंचवड :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कथित कटाचा अतिरिक्त आणि सखोल तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे.

काय आहे प्रकरण?

26 जुलै 2023 रोजी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई करत सात सराईत गुन्हेगारांना अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल नऊ पिस्तूल, 42 काडतुसे आणि कोयते जप्त करण्यात आले होते. अटक केलेले आरोपी पुणे, जालना आणि मध्य प्रदेशातील असून, त्यांच्यावर खून, खंडणी, तोडफोड आणि बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अधिवेशनात केली होती मागणी

या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित करत, या कटाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. तेव्हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आता पोलीस आयुक्तांनी तातडीने एसआयटीची स्थापना केली आहे.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी माहिती दिली की, "तळेगाव दाभाडेत यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिरिक्त तपास केला जाईल. तसेच या कटात अन्य कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचाही सखोल तपास केला जाईल."

हेही वाचा: Maharashtra Weather Update : पुन्हा एकदा राज्यात पावसाचा हाहाकार; मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ‘मुसळधार ते अतिमुसळधार’चा इशारा

शेअर करा