मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाला हादरा! सुधाकर बडगुजरांचा भाजपमध्ये शक्तिप्रदर्शनासह प्रवेश

•Sudhakar Badgujar In BJP "अनादर केला त्यांना दाखवू खरी ताकद," बडगुजरांचा ठाकरे गटाला थेट इशारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाला हादरा! सुधाकर बडगुजरांचा भाजपमध्ये शक्तिप्रदर्शनासह प्रवेश

•Sudhakar Badgujar In BJP "अनादर केला त्यांना दाखवू खरी ताकद," बडगुजरांचा ठाकरे गटाला थेट इशारा

मुंबई | नाशिकच्या राजकारणातील मातब्बर नेते सुधाकर बडगुजर यांनी आज शिवसेना (ठाकरे गट) सोडून थेट भाजपमध्ये दमदार शक्तिप्रदर्शनासह प्रवेश केला. मुंबईतील नरीमन पॉइंटवरील भाजप कार्यालयाबाहेर ढोल-ताशांचा गजर आणि हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते रवींद्र चव्हाण यांच्या अनुपस्थितीत काही वेळ बडगुजर यांना ताटकळत थांबावे लागले. मात्र नंतर पक्षनेत्यांच्या स्वागतासह त्यांनी प्रवेश केला.

"मी समाजासाठी काम करत राहिलो. कोविड काळातही कुणी पुढे येत नव्हतं, तेव्हा मी कोविड सेंटर चालवलं. पण ज्यांनी माझा अनादर केला, त्यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीत दूध का दूध, पाणी का पाणी होईल," अशा शब्दांत बडगुजर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली आणि दृष्टिकोन यांचे त्यांनी कौतुक केले आणि भाजपकडून मिळालेली जबाबदारी पूर्ण ताकदीनं पार पाडण्याचं आश्वासन दिलं.

यावेळी बडगुजर यांच्यासोबत माजी मंत्री बबन घोलप यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करत, "ज्याचं अपमान झाला त्याच्यासोबत राहणं हेच खरं राजकारण," अशा शब्दांत ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगुजरांचा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा: Sharad Pawar : "सगळ्यांना घेऊन चालणार, पण विचारवंतांना - संधीसाधूंना नाही!" - शरद पवारांची भाजपावर टोलेबाजी

शेअर करा