मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar : "सगळ्यांना घेऊन चालणार, पण विचारवंतांना - संधीसाधूंना नाही!" - शरद पवारांची भाजपावर टोलेबाजी

•पिंपरी चिंचवडच्या मेळाव्यात शरद पवारांचा काँग्रेस विचारांशी एकनिष्ठतेचा पुनरुच्चार!

V
Vivek

1 मिनिट वाचन

NCP Sharad Pawar: Pawar's shout on NCP's anniversary: ​​'Opportunity for new leadership'!

•पिंपरी चिंचवडच्या मेळाव्यात शरद पवारांचा काँग्रेस विचारांशी एकनिष्ठतेचा पुनरुच्चार!

पिंपरी चिंचवड | राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय रणनितीला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष युती, आघाड्या, आणि अंतर्गत गटांमधील एकत्रिततेवर विचार करत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र यावर ठाम भूमिका घेत भाजपाबरोबर जाणाऱ्यांवर निशाणा साधला.

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना पवारांनी काँग्रेसच्या विचारधारेची पाठराखण करताना स्पष्ट केलं की, "सगळ्यांना सोबत घेण्याचा आग्रह योग्यच, पण हे सगळे गांधी-नेहरू-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार मानणारे असले पाहिजेत. केवळ सत्तेसाठी भाजपाच्या मांडीला मांडी लावणारे 'सगळे' या व्याख्येत येत नाहीत."

भूतकाळातील आठवणी सांगताना त्यांनी 1980 सालच्या प्रसंगाचा दाखला देत, "जे सोडून गेले, ते पुन्हा निवडून आले नाहीत," असं म्हणत गटबाजीच्या चर्चांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं. अजित पवार गटाशी एकत्र येण्याच्या चर्चांनाही यामुळे अप्रत्यक्ष उत्तर मिळालं असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत स्पष्ट केले की, "कोण आला-गेला याचा विचार करू नका, लोकशाही सामान्य जनतेच्या शहाणपणावर उभी आहे. आपली नवी नेतृत्ववर्ग घडवण्याची हीच वेळ आहे."

येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी दिलेले हे विधान पक्षांतर्गत निष्ठा, विचारधारेला प्राधान्य, आणि भाजपाविरोधातील लढ्याची रणनीती अशा तिन्ही पातळ्यांवर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा: Mumbai Govandi News : गोवंडीतील भीषण अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ; माजी नगरसेविकेसह 8 जणांवर गुन्हा दाखल

शेअर करा