State Excise Pune ACB Trap : 22 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
पुणे, 10 Aug 2026, महाराष्ट्र मिरर : State Excise Pune ACB Trap : मद्यविक्रीशी संबंधित परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.
1 मिनिट वाचन

परवाना मंजुरीसाठी 20 लाखांची मागणी; तडजोडीनंतर ११ लाखांवर सेटलमेंट State excise pune acb trap
पुणे, 10 Aug 2026, महाराष्ट्र मिरर : State Excise Pune ACB Trap : मद्यविक्रीशी संबंधित परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७), निरीक्षक, एक्साईज डिपार्टमेंट, एच झोन, शास्त्रीनगर, येरवडा असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीने सोमवारी (दि. १०) ही कारवाई केली. State Excise Pune ACB Trap : Maharashtra Mirror

तक्रारदार हे व्यवसायाने लायसन्स कन्सल्टंट आहेत. त्यांच्या लोकसेवक असलेल्या क्लायंटची व त्यांच्या पत्नीच्या नावे पुणे येथे फर्म असून, त्या फर्मच्या मंजुरीसाठी फाईल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे होती. ही फाईल मंजूर करण्यासाठी पाटील यांनी १२ लाख रुपये तसेच संबंधित फर्मच्या पत्नीच्या ब्रुअरीची फाईल मंजूर करण्यासाठी आणखी ८ लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारदाराने १० एप्रिल २०२६ रोजी याबाबत एसीबीच्या पुणे पथकाकडे तक्रार दिली. State Excise Pune ACB Trap
तक्रारीनंतर एसीबीने १३ एप्रिल, २१ मे आणि २२ मे रोजी पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान पाटील यांनी तक्रारदाराकडे एकूण २२ लाख रुपयांची लाच मागितल्याचे आणि तडजोडीअंती ११ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे एसीबीच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा क्रमांक ३१८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी जितेंद्र पाटील यांना सोमवारी सायंकाळी ५.१० वाजता अटक करण्यात आली. Anti-Corruption Bureau of Maharashtra

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




