मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली; चालकाचा मृत्यू

फिर्यादी आणि त्यांचा मित्र दिनेश हे दोघे गंभीर जखमी झाले

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली; चालकाचा मृत्यू

फिर्यादी आणि त्यांचा मित्र दिनेश हे दोघे गंभीर जखमी झाले

पिंपरी: भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (१७ मे) रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास भोसरी उड्डाणपुलावर घडली.

याप्रकरणी प्रसाद बाळू गायकवाड (२९, वडगाव पाटोळ, खेड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारसायकल चालक राहुल शंकर लगाडे (३०, खेड) याचे या अपघातात निधन झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद गायकवाड, त्यांचा मित्र दिनेश ओव्हाळ आणि राहुल लगाडे हे तिघेजण प्रसाद यांच्या दुचाकीवरून (एमएच १४/एमएक्स ६२७६) नाशिक फाटा, कासारवाडी येथे जात होते. राहुल हा दुचाकी चालवत होता. त्याने दुचाकी वेगात चालवून दुभाजकाला धडक दिली. या अपघातात फिर्यादी आणि त्यांचा मित्र दिनेश हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर राहुल याचा मृत्यू झाला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

शेअर करा