मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Smriti Irani : भाजपा नेत्या स्मृती इराणी यांचे काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बद्दल मोठे वक्तव्य

•राहुल गांधी यांचे राजकारण बदललं आहे….

V
Vivek

1 मिनिट वाचन

Smriti Irani : भाजपा नेत्या स्मृती इराणी यांचे काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बद्दल मोठे वक्तव्य

•राहुल गांधी यांचे राजकारण बदललं आहे…. स्मृती इराणी

ANI :- भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखती दरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा करताना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, आता राहुल गांधींचं राजकारण बदललं आहे. ते एक वेगळे राजकारण करत आहे. तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण ही वेगळी गोष्ट आहे. असं स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी संसदेत टी-शर्ट घातला आहे. पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टने तरुण पिढीला काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे, हे त्यांना माहीत आहे. आपण गैरसमजात राहू नये. त्यांनी उचललेलं पाऊल तुम्हाला योग्य वाटेल किंवा अयोग्य वाटेल पण ते वेगळं राजकारण करत आहेत."

उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. "आता राहुल गांधींचं राजकारण बदललं आहे. ते एक वेगळं राजकारण करत आहेत. तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण ही वेगळी गोष्ट आहे" असं स्मृती यांनी म्हटलं आहे

स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने 2024 च्या निवडणुकीत या पराभवाचा बदला घेतला आणि स्मृती इराणी यांचा पराभव केला. अमेठीमध्ये किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृहखात्यांवर उपस्थित केले प्रश्न

शेअर करा