मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shivajirao Kardile Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे निधन; वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

• हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार कर्डीले यांची प्राणज्योत मालवली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Shivajirao Kardile Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे निधन; वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

• हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार कर्डीले यांची प्राणज्योत मालवली

अहमदनगर (अहिल्यानगर) :- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) जिल्ह्यातील राजकारणातील मोठे प्रस्थ असलेले माजी आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचे आज (गुरुवार, 17 ऑक्टोबर 2025) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

राजकीय आणि वैयक्तिक जीवन

शिवाजी कर्डीले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे सहावेळा आमदार होते. एका मोठ्या आजारातून नुकतेच बरे झाल्यानंतर पहाटे त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राजकीय प्रवास: नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथील शिवाजी कर्डीले यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अपक्ष म्हणून आमदारकीवर निवडून येण्यापर्यंत आणि भाजपच्या माध्यमातून राज्यभर ओळख निर्माण करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.

उद्योग क्षेत्रात: दुधाचा व्यवसाय, जमिनीचे व्यवहार, बांधकाम साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योगामुळे त्यांचे नाव जिल्ह्याभरात प्रसिद्ध होते.

महत्त्वाचे विजय: 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. 2014 च्या निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभा घेतली होती.

नातेसंबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर संदीप कोतकर हे त्यांचे जावई आहेत. त्यांची कन्या शिवसेनेच्या गाडे परिवारात दिलेली आहे. त्यांचे पुत्र अक्षय कर्डीले यांनीही आता राजकारणात प्रवेश केला आहे.

शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा