मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका

Sanjay Raut Target Cm Eknath Shinde And Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा….

V
Vivek

2 मिनिट वाचन

Sanjay Raut News

Sanjay Raut Target Cm Eknath Shinde And Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा…. ते रावणाची औलाद आहे, श्रीकांत शिंदेवर टीका करताना संजय राऊत त्यांची जीभ घसरली

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत Sanjay यांनी शिंदे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली आहे. टीका करताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा आहे. रावणाची औलाद आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली आहे.

शिंदे पिता पुत्रांवर टीका

संजय राऊत म्हणाले, श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकिची सर्टिफिकेट तपासा, चोरलेला धनुष्यबाण लोकसभेला छातीवर पडला. ते रावणाची औलाद आहेत", अशा खालच्या शब्दांत राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर टीका केली आहे. तसेच श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला आहे. श्रीकांत शिंदे यांची लायकी नसताना, उद्धव ठाकरे यांनी खासदार बनवले. त्यांचे वडील आले, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे नाक रगडले", असे राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणाले, "श्रीकांत शिंदेंचे वडील माझ्या मुलाकडे काम नाही. तो बेरोजगार आहे. त्याच्याकडे डॉक्टरची डिग्री आहे, पण रूग्णालय चालवता येत नाही. त्याला मेडिकलच ज्ञान नाही असे उद्धव ठाकरेंना म्हणाले होते. श्रीकांत शिंदेंना लाज वाटली पाहिजे", अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्ला पंतप्रधान मोदी यांच्या वन नेशन, वन इलेक्शनच्या घोषणेवरून संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "मोदी लाल किल्ल्यावरून छाती ठोकून वन नेशन, वन इलेक्शनबाबत बोलतात. मात्र चार राज्यातील निवडणुका ते एकत्र घेऊ शकत नाहीत. जे सरकार चार राज्यातील निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन, वन इलेक्शनच्या गोष्टी करून खोटे बोलत आहेत. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये त्यांना पराभवाची भीती आहे. त्यामुळेच या दोन्ही राज्यात निवडणुकांसाठी त्यांना जास्त वेळ पाहिजे आहे. त्यासाठी सणवार किंवा इतर कारणे दिली जात आहेत", असा आरोप राऊतांनी केला आहे.

सुडाचे राजकारण फडणवीसांनी सुरू केले नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार आले तर सर्व योजना बंद केल्या जातील असे विधान केले आहे. त्यावर संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हे लोक असे कोण लागून गेले की त्यांच्या योजना आम्ही बंद करू?, आम्ही महाराष्ट्रावर कधी राज्य केले नाही का?, महाराष्ट्रात शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री होते. फडणवीसांनी महाराष्ट्रातील परंपरा समजणे गरजेचे आहे. ही योजना बंद, ती योजना बंद हे सुडाचे राजकारण फडणवीसांनी सुरू केले", असे राऊत म्हणाले.

हेही वाचा: Nashik News : नाशिकमध्ये मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांची कारवाई, 15 हल्लेखोर ताब्यात

शेअर करा