मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : शिवसेना खरी आणि डुप्लिकेट हे भारतीय जनता पक्ष ठरू शकत नाही… खासदार संजय राऊत

Sanjay Raut Reply Amit Shah : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा भाजप नेत्यांवर निशाणा साधला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut Target BJP

Sanjay Raut Reply Amit Shah : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा भाजप नेत्यांवर निशाणा साधला

मुंबई ‌:- एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या डुप्लिकेट पक्षांचा निकाल जनता लावल्याशिवाय राहणार नाही, असा पलटवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे. अमित शहा हे नांदेड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी राहिलेल्या काँग्रेसची सध्या "तीन तिगाडा, काम बिघाडा" अशी अवस्था झाली असल्याची टीका केली होती. त्यांच्या याच विधानाचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतला आहे. Sanjay Raut Reply Amit Shah

खोटे गोटे गळ्यात अडकून फिरत आहात आज प्रसार माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले, "आता तुम्ही शिंदे गट आणि अजित पवार गट पक्षाचे खोटे गोटे गळ्यात अडकून फिरत आहात, हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट पक्षांचा निकाल जनताच लावेलच, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

नकली शिवसेनाप्रमुखांसमोर नाक रगडण्यासाठी आले पुढे राऊत म्हणाले, "अमित शहा यांनी जे विधान केले आहे ते आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. असली कोण आणि नकली कोण? हे अमित शहा ठरवू शकत नाहीत. उद्धव ठाकरे जर नकली शिवसेनेचे प्रमुख आहेत, तर 2019 साली तुम्ही त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी मातोश्रीवर का आला होतात?" असा खोचक सवालही संजय राऊत यांनी अमित शहांना विचारला आहे. Sanjay Raut Reply Amit Shah

भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून धमकीचे सत्र सुरू

यावेळी राऊतांनी महायुतीला खुले आव्हान दिले आहे. "मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. माझे महायुतीला चॅलेंज आहे, त्यांनी मुंबईतील एकतरी जागा जिंकून दाखवावी. या देशाची जनता लोकसभेची निवडणूक जिंकू देणार नाही", असे राऊत म्हणाले. तसेच निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून सरपंचांना धमक्या दिल्या जात आहेत, मतदारांना आमिष दिले जात आहे. हातकंगले ते कोकणात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून धमकीचे सत्र सुरू आहे", असा गंभीर आरोप देखील राऊतांनी केला आहे. Sanjay Raut Reply Amit Shah

हेही वाचा: RCB Vs MI : IPL 2024 : मुंबईने आरसीबीला धूळ चारली, सूर्या-इशानच्या जोरावर 7 विकेट्सने विजय मिळवला

शेअर करा