मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sheena Bora Murder Case Update : शीना बोरा प्रकरणात नवा ट्विस्ट: सीबीआयने जबाब बनावट असल्याचा विधी मुखर्जीचा दावा

•कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन खोटे जबाब दाखल केल्याचा आरोप; इंद्राणी मुखर्जीला अडकवण्याचा कट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sheena Bora Murder Case Update : शीना बोरा प्रकरणात नवा ट्विस्ट: सीबीआयने जबाब बनावट असल्याचा विधी मुखर्जीचा दावा

•कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन खोटे जबाब दाखल केल्याचा आरोप; इंद्राणी मुखर्जीला अडकवण्याचा कट

मुंबई :- तब्बल 13 वर्षांपूर्वी गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आणि इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जी हिने सीबीआयवरच धक्कादायक आरोप केला आहे. सीबीआयने तिच्या नावाने न्यायालयात सादर केलेला जबाब बनावट आणि खोटा असल्याचा दावा तिने केला आहे.

विधी मुखर्जीचे नेमके आरोप काय?

विधी मुखर्जीने न्यायालयात सांगितले की, सीबीआयने शीना बोरा प्रकरणात माझा जबाब म्हणून जे काही सादर केले आहे, ते खोटे आहे. सीबीआयने कोऱ्या कागदांवर आणि ई-मेलच्या प्रतींवर माझ्या सह्या घेतल्या आणि नंतर त्या कागदपत्रांचा वापर जबाब म्हणून केला.

"जेव्हा माझी चौकशी केली जात होती, तेव्हा मी कधीही एकटी नव्हते. माझे सावत्र वडील पीटर मुखर्जी किंवा बहीण शंगोन दास गुप्ता यांच्यापैकी कुणीतरी सोबत होते," असे विधीने कोर्टात सांगितले. खोटे जबाब आरोपपत्रात दाखल करून कोणालातरी जाणूनबुजून फसवण्याचा सीबीआयचा डाव असल्याचा आरोपही तिने केला.
याशिवाय, आई इंद्राणी मुखर्जीला या प्रकरणात अडकवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही विधीने केला आहे. इंद्राणीच्या अटकेनंतर तिचे करोडो रुपयांचे दागिने आणि बँकेतील ७ कोटी रुपये चोरीला गेल्याचा खळबळजनक दावाही तिने केला.

शीना बोरा हत्या प्रकरण

शीना बोरा हत्या प्रकरण 2015 मध्ये उघडकीस आले होते, तेव्हा संपूर्ण देशभरात त्याची जोरदार चर्चा झाली. 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या झाली होती. इंद्राणीचा चालक शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक केल्यावर त्याने दिलेल्या माहितीवरून या प्रकरणाचा उलगडा झाला.
इंद्राणी मुखर्जीने तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांच्या मदतीने आपली मुलगी शीना बोराची हत्या करून तिचा मृतदेह 25 एप्रिल 2012 रोजी विल्हेवाट लावला, असा आरोप आहे. सध्या इंद्राणी मुखर्जी जामीनावर बाहेर आहे.

हेही वाचा: Ganesh Visarjan 2025 : 6 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा: उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

शेअर करा