मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी सुटणार! महापालिका अक्शन मोडवर

ग्रेड सेप्रटेरसह उड्डाणपूलाचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी सुटणार! महापालिका अक्शन मोडवर
ग्रेड सेप्रटेरसह उड्डाणपूलाचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

ग्रेड सेप्रटेरसह उड्डाणपूलाचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश https://maharashtramirror.com/

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे - नगर रस्त्यावरील गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन अक्शन मोडवर आहे. प्रस्तावित ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्रकल्पाला गती देत पुणे महापालिकेने काम पूर्ण करण्याचा स्पष्ट आराखडा तयार केला आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी गुरुवारी (दि. १३) प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. ग्रेड सेपरेटरचे काम पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्यासह संपूर्ण प्रकल्प मार्च २०२७ अखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराला दिले.( maharashtra mirror)

सध्या पुणे - नगर रोडवरून येणारी वाहतूक गोल्फ चौकमार्गे मुंबईच्या दिशेने, तसेच कल्याणीनगर व गुंजन चौकाकडे जाते. या सर्व मार्गांवरील वाहनांचा प्रचंड ताण शास्त्रीनगर चौकावर पडत असल्याने दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या वतीने दोन मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. .( maharashtra mirror)https://maharashtramirror.com

आगाखान पॅलेस ते गुंजन चौक यादरम्यान सुमारे ७५० मीटर लांबीचा सहा लेनचा ग्रेड सेपरेटर उभारला जाणार आहे. आगाखान पॅलेस ते गोल्फ चौक यादरम्यान सुमारे ७०० मीटर लांबीचा चार लेनचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. .( maharashtra mirror)

या दोन्ही प्रकल्पांमुळे नगर रोड, कल्याणीनगर, गुंजन चौक, गोल्फ चौक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांचा वेळ वाचणार असून, या परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. .( maharashtra mirror)

या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, उपायुक्त आशा राऊत, सोमनाथ बनकर, नंदकिशोर जगताप, संतोष वारुळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. .( maharashtra mirror)

“प्रकल्पाचे काम करताना नागरिकांना अथवा वाहतुकीला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. वाहतूक पोलीस विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांशी योग्य समन्वय साधून, तांत्रिक बाबी आणि नियोजनाची अचूक पूर्तता करत कामाचा वेग वाढवावा.”

— नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका .( maharashtra mirror)https://maharashtramirror.com/

शेअर करा