मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; उपचारानंतर मुंबईतील सिल्व्हर ओककडे रवाना

Pune News :पुणे : ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना दोन दिवसांच्या उपचारांनंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; उपचारानंतर मुंबईतील सिल्व्हर ओककडे रवाना
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; उपचारानंतर मुंबईतील सिल्व्हर ओककडे रवाना

Pune News :पुणे : ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना दोन दिवसांच्या उपचारांनंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या पवार यांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.https://maharashtramirror.com/ Pune News

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार व्हीलचेअरवरून बाहेर आले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हात उंचावून अभिवादन केले. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर ते कारमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. विशेष म्हणजे, बारामती येथील निवासस्थानी न जाता ते थेट मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाणार आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत आहेत. दरम्यान, रुग्णालयातून बाहेर पडण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले.https://maharashtramirror.com/ Pune News

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती
गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफ आणि तीव्र खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा नियोजित दुष्काळ पाहणी दौरा तातडीने रद्द करण्यात आला होता. तसेच इतर सर्व नियोजित कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आले होते.

आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेणार आहेत. दिवाळीनंतर ते पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदींचा फोन; प्रकृतीची केली विचारपूस
शरद पवार यांच्या प्रकृतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून विचारपूस केली. पवार यांचे निकटवर्तीय आणि मित्र विठ्ठल मणियार यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

या फोन संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पवार यांना प्रकृतीची पूर्ण काळजी घेण्याचा आणि कोणतीही चिंता न करता विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

'आम्ही सर्व मिळून देश सांभाळू'
विठ्ठल मणियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्याशी संवाद साधताना, “आपण आपल्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्या. कशाचीही चिंता करू नका. सुप्रिया सुळे आता उत्तम प्रकारे तयार आहेत. आम्ही सर्व मिळून देश सांभाळू,” असे म्हटले. पंतप्रधानांनी आपुलकीने फोन करून प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल शरद पवार यांनीही त्यांचे मनापासून आभार मानले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा