मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vasai Crime News : तडीपार असूनही जबरी चोरी! पोलिसांच्या जाळ्यात 'कलप्या' अखेर सापडला

• वसई गुन्हे शाखेची शक्कल फळाला – 12 गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्डधारक गजाआड

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vasai Crime News : तडीपार असूनही जबरी चोरी! पोलिसांच्या जाळ्यात 'कलप्या' अखेर सापडला

•वसई गुन्हे शाखेची शक्कल फळाला – 12 गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्डधारक गजाआड

वसई | तडीपार आदेश झुगारून पुन्हा गुन्ह्याच्या मार्गावर उतरणाऱ्या कुख्यात 'कलप्या'चा अखेर शेवट झाला! गुन्हे शाखा कक्ष-2, वसईच्या पथकाने कौशल्यपूर्ण सापळा रचून या सराईत गुन्हेगाराला अटक केली. कल्पेश ऊर्फ कलप्या किसन शिंदे (वय 24, रा. नाईकपाडा, वसई पूर्व) या आरोपीविरोधात जबरी चोरीसह तब्बल 12 गुन्हे नोंद आहेत.

गर्दीच्या वसईत खुलेआम फिरणारा तडीपार आरोपी पोलिसांच्या 'वॉच'मध्ये अडकला

पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान भगत शाळेजवळ संशयित हालचाल लक्षात घेत तातडीने कारवाई केली. चौकशीदरम्यान आरोपीच्या तडीपार आदेशाचे उल्लंघन उघडकीस आले. शिवाय, 30 नोव्हेंबर 2024 रोजी सातीवली येथे एका नागरिकाच्या गळ्यावर चाकू ठेवून मोबाईल हिसकावल्याचा गंभीर गुन्हाही त्याने कबूल केला.

या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा नोंद असून, या कारवाईमुळे पोलिसांना एक मोठा सासवणारा गुन्हेगार हाती लागला आहे. कलप्या याच्यावर मालमत्ता व शरीराविरुद्ध गुन्ह्यांचे डझनभर गुन्हे दाखल असून, तो वसई परिसरात पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय,अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ,पोलीस निरीक्षक समीर अहिरराव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे,पोलीस उपनिरीक्षक अजित गिते,पोलीस हवालदार रमेश भोसले,रविंद्र पवार,मुकेश पवार,प्रफुल्ल पाटील,सचिन पाटील,जगदिश गोवारी,दादा आडके,सुधीर नरळे,राहुल कर्पे, पोलीस नाईक प्रशांतकुमार ठाकुर,पोलीस अंमलदार अनिल साबळे,प्रतिक गोडगे,राजकुमार गायकवाड,अविनाश चौधरी गुन्हे शाखा कक्ष-2 वसई मि.भा.व.वि. यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.

हेही वाचा: Shani Shingnapur : शनि शिंगणापूर मंदिरातून 167 कर्मचाऱ्यांची कपात!

शेअर करा