मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shani Shingnapur : शनि शिंगणापूर मंदिरातून 167 कर्मचाऱ्यांची कपात!

•114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती; धार्मिक पाश्र्वभूमीवरून वादाचे वारे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Shani Shingnapur : शनि शिंगणापूर मंदिरातून 167 कर्मचाऱ्यांची कपात!

•114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती; धार्मिक पाश्र्वभूमीवरून वादाचे वारे

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनि शिंगणापूर मंदिरातील व्यवस्थापन समितीने मोठा निर्णय घेत 167 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 114 कर्मचारी मुस्लिम समाजातील असल्याने या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

मंदिर ट्रस्टने या निर्णयामागे शिस्तभंग आणि प्रशासनातील अनियमितता कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. अनेक कर्मचारी मागील पाच महिन्यांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर गैरहजर होते. मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन आणि शैक्षणिक विभागातील कर्मचाऱ्यांना याची झळ बसली आहे.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या आध्यात्मिक समन्वय मोर्चाचे प्रमुख आचार्य तुषार भोसले म्हणाले, “मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे चुकीचे पाऊल होते. आम्ही सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन केले होते आणि त्याचा परिणाम म्हणूनच ट्रस्टला झुकावे लागले.” त्यांनी याला 'सकल हिंदू समाजाच्या एकजुटीचा विजय' असे संबोधले.

मात्र, या निर्णयामागे धार्मिक आणि राजकीय दबावही असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 14 जून रोजी नियोजित आंदोलनाच्या एक दिवस आधी ट्रस्टने ही बैठक घेऊन अचानकपणे बडतर्फीचा निर्णय घेतल्याने परिस्थिती अधिकच तापली आहे.

दरम्यान, ट्रस्टचे ट्रस्टी अप्पासाहेब शेटे यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, “धर्माच्या आधारावर नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थिती आणि कामकाजातील शिथिलतेच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती.”

हेही वाचा: Kalyan Crime News : सायबर गुन्ह्यांवर सीबीआयचा ‘ऑपरेशन चक्र’ घाव: कल्याणमध्ये एक अटकेत

शेअर करा