मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Crime News : गुगलवर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असतांना Any Desk हे थर्डपार्टी सॉफ्टवेअर डाऊनलोड 31 लाख रुपयांची फसवणुक

9 लाख 90 हजार रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात ,काशिमीरा पोलीस ठाण्यास यश

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mira Road Crime News : गुगलवर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असतांना Any Desk हे थर्डपार्टी सॉफ्टवेअर डाऊनलोड 31 लाख रुपयांची फसवणुक

9 लाख 90 हजार रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात ,काशिमीरा पोलीस ठाण्यास यश

मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणा-या श्रीमती. माया चक्रवती हे गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर प्राप्त करुन फोन केला असता ओला ॲप नावाने BFK ॲप पाठविले सदरचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगुन त्याद्यारे संशयीत यांनी फिर्यादी याचे खात्यावरुन इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर करुन फिर्यादी याची 31 लाख 40 हजार 500 रुपयाची फसवणुक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा भादंवीसं कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनीयमकलम 66 (सी),66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. Mira Road Crime News

तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे इराले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली, प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बैंक खात्यात पळती झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बैंकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी/ अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 9 लाख 90 हजार रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Mira Road Crime News

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी प्यावयाची काळजी…

अशा प्रकारे फसवे कॉल अथवा एसएमएस प्राप्त झाल्यास त्यावर कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देवू नये.

• आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणारे एसएमएस, ईमेल, कॉल्स यांची विश्वासहर्ताची पडताळणी करावी.

आपले मोबाईलवर प्राप्त होणारा OTP किंवा आपली वैयक्तीक माहिती देवु नये. Mira Road Crime News

  • तसेच फसवणुक झालेचे लक्षात येताच लगेचच नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,
  • कोणतेही अनाधिकृत ॲप्लीकेशन डाऊनलोड करु नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करु नये.

    • ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बैंकेला संपर्क करावा.
    • मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी. Mira Road Crime News

      पोलीस पथक

      प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस उप निरीक्षक वैभव धनावडे, पोलीस हवालदार दिनेश आहेर यांनी पार पाडली आहे. Mira Road Crime News

      शेअर करा