मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sayaji Shinde Meet Raj Thackeray : 'तपोवन वाचवा' मोहिमेला राज ठाकरे यांचा पाठिंबा! - अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Sayaji Shinde Meet Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याची दर्शवली तयारी; मोहिमेची व्याप्ती वाढवण्यावर बैठकीत चर्चा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sayaji Shinde Meet Raj Thackeray : 'तपोवन वाचवा' मोहिमेला राज ठाकरे यांचा पाठिंबा! - अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Sayaji Shinde Meet Raj Thackeray :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याची दर्शवली तयारी; मोहिमेची व्याप्ती वाढवण्यावर बैठकीत चर्चा

मुंबई :- नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वृक्षतोडी विरोधातील 'तपोवन वाचवा' मोहिमेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळाला आहे. आज (8 डिसेंबर) प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे Sayaji Shinde यांनी राज ठाकरे Raj Thackeray यांची विशेष भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर देखील उपस्थित होते. Nashik Forest Cutting Lav Latest News

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

या महत्त्वाच्या बैठकीत तपोवन परिसरातील जैवविविधतेचे रक्षण, पर्यावरणाचे जतन आणि स्थानिकांच्या सहभागाने ही मोहीम अधिक व्यापक कशी करता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली.
राज ठाकरे यांनी 'तपोवन वाचवा' मोहिमेबद्दल सकारात्मक भूमिका दर्शवली असून, पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

यामुळे नाशिकमधील वृक्षतोड थांबवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मनसेच्या माध्यमातून मोठे बळ मिळणार आहे. मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेने यापूर्वीच तपोवन येथे आंदोलन केले आहे.

शेअर करा