मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Satara News : टेबल पॉईंटवर स्टंट करताना कार 300 फूट खोलात कोसळली; युवक गंभीर जखमी

•घटनास्थळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; टेबल पॉईंटवरील अपघात पुन्हा ऐरणीवर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Satara News : टेबल पॉईंटवर स्टंट करताना कार 300 फूट खोलात कोसळली; युवक गंभीर जखमी

•घटनास्थळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; टेबल पॉईंटवरील अपघात पुन्हा ऐरणीवर

सातारा | सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ टेबल पॉईंट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये, एक युवक आपल्या कारने स्टंट करताना दिसतो. मात्र काही क्षणांतच कारवरील त्याचा ताबा सुटतो आणि ती थेट सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळते. या अपघातात चालक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे. "टेबल पॉईंटवर कोणतीही सुरक्षारेलिंग नाही, ना कोणताही दक्षतेचा इशारा दिलेला आहे. आधीही आम्ही प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या होत्या, पण कुठलीही कारवाई झालेली नाही," अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

टेबल पॉईंट हे सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील निसर्गसौंदर्य आणि उंच पठारावरून दिसणारे नजारे पर्यटकांना भुरळ घालतात. विशेषतः तरुणाई रील्ससाठी मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करत असते. मात्र, सुरक्षेच्या प्राथमिक सुविधा नसल्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक रहिवासी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोल दरीत कोसळलेल्या कारमधून युवकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल काही तासांच्या प्रयत्नांनंतर युवकाला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: Mumbai BEST Accident : मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; चालक, वाहकसह सहा प्रवासी जखमी

शेअर करा