मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीची समन्वय बैठक; जागावाटपाचा तिढा कायम

Satara News :सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांची पहिली अधिकृत समन्वय बैठक रात्री उशिरा साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये पार पडली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/
ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Satara News :सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांची पहिली अधिकृत समन्वय बैठक रात्री उशिरा साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये पार पडली. मात्र, २१ जागांसाठी तब्बल २३६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने इच्छुकांची संख्या मोठी असून, जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.https://maharashtramirror.com/ Satara News

या बैठकीला भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार धैर्यशील कदम, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Satara News

विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या महत्त्वपूर्ण बैठकीला गैरहजर राहिल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेदांबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या गैरहजेरीमागील नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

२१ जागांसाठी २३६ अर्ज; बंडखोरी रोखण्याचे आव्हान
सातारा जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदांसाठी तब्बल २३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांची माघार घडवून आणणे आणि संभाव्य बंडखोरी रोखणे, हे महायुतीच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

महायुतीच्या माध्यमातून एकत्रित पॅनेल उभे करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, भाजपकडून वाढीव जागांची मागणी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने याबाबत सावध भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही.

रामराजे नाईक-निंबाळकरांची मिश्कील टिप्पणी
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, ‘सध्या मी रिटायर्ड आहे,’ अशी मिश्कील टिप्पणी करत या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

आता महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावर नेमका कोणता तोडगा निघतो, तसेच २३६ इच्छुकांपैकी किती जण माघार घेतात, याकडे सातारा जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा