मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Santosh Pandit यांना वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी अटक

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

Santosh Pandit

Santosh Pandit : आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पुणे येथील यूट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली

पुणे, महाराष्ट्र मिरर

Santosh Panidit : पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांवर आणि स्थानिक राजकारणावर टीका करणारे व्हिडिओ बनवणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व यूट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका माजी नगरसेविकेविरुद्ध कथितरित्या आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक भाषा वापरल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. santosh pandit arrested controversial video

मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर कोथरूड व डेक्कन पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत बुधवारी रात्री उशिरा व गुरुवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास पंडित यांच्या निवासस्थानावर धडक दिली. काही पोलीस कर्मचारी साध्या वेशात दोन वाहनांमधून त्यांच्या घरी पोहोचले होते. अटकेची ही कारवाई सुरू असताना पंडित यांच्या कुटुंबीयांनी मोबाईलवर संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संतोष पंडित यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.Santosh Pandit

Pune Crime: विजय रौंदळ, अभी विजय रौंदळ आणि देवेंद्र शहा यांच्यावर गुन्हा

पोलिसांवर गंभीर आरोप नंतर नरमाईची भूमिका
“पोलीस रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घरात घुसतात, आमच्यासारख्या सामान्यांचे हेच नशीब आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी कॅमेऱ्यासमोर दिली. तसेच, नंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत पोलिसांची माफी मागितली आणि “माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर क्षमस्व, मला अटक केल्याबद्दल धन्यवाद,” असे म्हटले. गाडीत बसण्यापूर्वी त्यांनी आपला मोबाईल फोन, वाहनांच्या चाव्या आणि बेल्ट कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.

संतोष पंडित हे नियमितपणे सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांदर्भातील त्रुटींवर बोट ठेवतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोथरूड परिसरातील विकासकामांच्या मुद्द्यावरून एक व्हिडिओ क्लिप अपलोड केली होती. या व्हिडिओमध्ये थेट नाव न घेता मंत्र्यांचे छायाचित्र वापरून अत्यंत आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. Santosh Pandit

Pune Crime : जमिनीच्या सुनावणीचा आदेश मिळवून देण्यासाठी २५ हजारांची लाच; पुरंदर तहसील कार्यालयातील लिपिक रंगेहाथ जाळ्यात


भाजपचे स्थानिक नेते आणि माजी नगरसेवकांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेत पोलिसांत धाव घेतली. मंत्री महोदयांची जाहीर बदनामी करण्याचा आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा यामागे हेतू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीच्या आधारे डेक्कन आणि कोथरूड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. Santosh Pandit

Pune News: अंमली पदार्थमुक्त समाजासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आवाहन

यापूर्वीही पोलिसांकडून पंडित यांना चौकशीत सहकार्य करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, योग्य सहकार्य न मिळाल्यामुळे अखेर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सोशल मीडियावरील बेजबाबदार व बदनामीकारक व्यक्तव्यांवर पोलीस कडक कायदेशीर पावले उचलत असल्याचे यावरून स्पष्ट होते. Santosh Pandit

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा