मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी यूट्यूबर संतोष पंडितांना अटक

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर: महापालिकेच्या विकासकामांवर आणि स्थानिक राजकारणावर टीका करणारे व्हिडिओ बनवणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व यूट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी गुरुवारी (दि.3) पहाटेच्या सुमारास अटक केली.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी यूट्यूबर संतोष पंडितांना अटक
आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी यूट्यूबर संतोष पंडितांना अटक

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर: महापालिकेच्या विकासकामांवर आणि स्थानिक राजकारणावर टीका करणारे व्हिडिओ बनवणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व यूट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी गुरुवारी (दि.3) पहाटेच्या सुमारास अटक केली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका माजी नगरसेविकेविरुद्ध कथितरित्या आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक भाषा वापरल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर कोथरूड व डेक्कन पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत गुरुवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास पंडित यांच्या निवासस्थानावर धडक दिली. काही पोलीस कर्मचारी साध्या वेशात दोन वाहनांमधून त्यांच्या घरी पोहोचले होते. अटकेची ही कारवाई सुरू असताना पंडित यांच्या कुटुंबीयांनी मोबाईलवर संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संतोष पंडित यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. https://maharashtramirror.com/ Pune Crime

“पोलीस रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घरात घुसतात, आमच्यासारख्या सामान्यांचे हेच नशीब आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी कॅमेऱ्यासमोर दिली. तसेच, नंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत पोलिसांची माफी मागितली आणि “माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर क्षमस्व, मला अटक केल्याबद्दल धन्यवाद,” असे म्हटले. गाडीत बसण्यापूर्वी त्यांनी आपला मोबाईल फोन, वाहनांच्या चाव्या आणि बेल्ट कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.https://maharashtramirror.com/ Pune crime

संतोष पंडित यांनी काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरातील विकासकामांच्या मुद्द्यावरून एक व्हिडिओ क्लिप अपलोड केली होती. या व्हिडिओमध्ये थेट नाव न घेता मंत्र्यांचे छायाचित्र वापरून अत्यंत आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी येथील रहिवासी सारिका कांबळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये म्हटले आहे की, ‘‘संतोष पंडित यांनी समाज माध्यमांवर शेअर केलेले व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिले असून त्यांच्या भाषेमुळे स्त्री मनाला लज्जा उत्पन्न झाली, त्यांनी शांतता भंग करण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला,’’ असे आरोप करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime

यापूर्वीही पोलिसांकडून पंडित यांना चौकशीत सहकार्य करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, योग्य सहकार्य न मिळाल्यामुळे अखेर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्या. पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा