Pimpri News : संत तुकारामनगर येथे हॉस्टेलच्या उघड्या खोलीतून तीन लॅपटॉप चोरीला
Pimpri News : पिंपरी: हॉस्टेलच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने तब्बल ८० हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेले.
1 मिनिट वाचन

Pimpri News : हॉस्टेलच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचा घेतला फायदा
Pimpri News : पिंपरी: हॉस्टेलच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने तब्बल ८० हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना बुधवारी (३० सप्टेंबर) सकाळी संत तुकारामनगर येथील आध्या बॉईज हॉस्टेलमध्ये घडली. या प्रकरणी लक्ष केशवप्रताप सिंह (२०, रा. पिंपरी) या विद्यार्थ्याने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri News
त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विद्यार्थी आणि त्यांचे मित्र हॉस्टेलच्या रूम नंबर २०७ मध्ये राहत असताना सकाळी दरवाजा उघडा होता. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि खोलीत ठेवलेले ८० हजार रुपयांचे तीन लॅपटॉप चोरून पोबारा केला. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.https://maharashtramirror.com/ Pimpri News




