मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Shirsat : 'कदम यांचा आरोप बरोबरच, मी दोन दिवस मातोश्रीवर होतो!' बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरच्या वादग्रस्त घटनेला संजय शिरसाटांचा दुजोरा

•'विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच तयारी सुरू केली होती'; 'सरण कोणी रचले' यावर आता थेट नाव घेऊन खळबळजनक वक्तव्य.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Shirsat

•'विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच तयारी सुरू केली होती'; 'सरण कोणी रचले' यावर आता थेट नाव घेऊन खळबळजनक वक्तव्य.

मुंबई :- शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन दिवस 'मातोश्री'वर काय झाले? असा प्रश्न विचारून जो राजकीय वाद निर्माण केला होता, त्या वादाला आता शिंदे गटाचे आणखी एक नेते संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला आहे. शिरसाट यांनी रामदास कदम यांचे विधान बरोबरच असल्याचे सांगत, त्यावेळचा एक खळबळजनक प्रसंगही उघड केला आहे.

'मीदेखील दोन दिवस तिथेच होतो'

माध्यमांशी बोलताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना कदम यांच्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. यावर शिरसाट म्हणाले की, "मीदेखील दोन दिवस त्यावेळी मातोश्रीवरच होतो. रामदास कदम यांनी चुकीचा आरोप केलेला नाही. सत्य सर्वांनाच माहीत आहे, पण त्याचा उहापोह आम्ही कधी केला नाही."

'सरण कोणी रचले, नाव जाहीर करतो'

शिरसाट यांनी त्यावेळची एक धक्कादायक घटना सांगितली. ते म्हणाले की, "माझ्या माहितीप्रमाणे विनायक राऊत (माजी खासदार) यांनी दोन दिवसाआधी तयारी सुरू केली होती. त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनीही याबाबत मातोश्रीला प्रश्न विचारला होता, काय झालंय आम्हाला माहिती द्या."

त्यांनी पुढे धक्कादायक खुलासा करत म्हटले की, "बाळासाहेबांचे सरण या लोकांनी रचले होते. विनायक राऊत त्यात प्रमुख होते, हे मी नाव आज जाहीरच करतो."

'आम्हाला आत्म्याला दुखवायचे नाही'

या सर्व घडामोडींवर आता अधिक चर्चा करणे योग्य नाही, असे मतही शिरसाट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, "आता झालेल्या गोष्टींची पुन्हा चर्चा करून आम्हाला बाळासाहेबांच्या आत्म्याला दुखवायचे नाही."

बाळासाहेबांच्या निधनानंतर घडलेल्या कथित घटनांवर शिंदे गटाकडून एकापाठोपाठ एक गंभीर आरोप होत असल्याने, ठाकरे गट यावर अधिकृतपणे काय प्रतिक्रिया देतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis : 'उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार वाचवले!' मुख्यमंत्र्यांच्या 'नंबर'वरील टीकेला देवेंद्र फडणवीसांचे खास शैलीत प्रत्युत्तर

शेअर करा