मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : 'उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार वाचवले!' मुख्यमंत्र्यांच्या 'नंबर'वरील टीकेला देवेंद्र फडणवीसांचे खास शैलीत प्रत्युत्तर

•'भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही'; फडणवीस म्हणाले: 'निराश झालेल्या व्यक्तीकडे लक्ष द्यायचं नसतं.'

V
Vivek

2 मिनिट वाचन

Uddhav Thackeray

•'भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही'; फडणवीस म्हणाले: 'निराश झालेल्या व्यक्तीकडे लक्ष द्यायचं नसतं.'

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या जोरदार टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शैलीत पलटवार केला आहे. "उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले," असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरेंच्या भाषणाला महत्त्व न देण्याचा प्रयत्न केला.

'एक हजार रुपये वाचले!'

उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना, "मी मुख्यमंत्री असताना कोविड काळात देशात एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो. पण आताच्या यादीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर, तर आपले मुख्यमंत्री (फडणवीस) दहाव्या क्रमांकावर आहेत," अशी टीका केली होती.

या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेन. उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले. मी आवाहन केलं होतं, की उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, परंतु पत्रकारांकडून माहिती घेतली. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही, त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले."

यासोबतच, त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावताना म्हटले की, "एखादा व्यक्ती निराश झाला तर तो अदवातदवा बोलत असतो. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नसते."

शेतकऱ्यांच्या मदतीवरून टीका

या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकरी हताश झाला असून, महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप केला होता. "बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर 10-10 हजार रुपये टाकले, पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही," अशी टीका ठाकरेंनी केली होती.

हिंदुत्व आणि 'हिरवा रंग'

भाजपच्या हिंदुत्वावर टीका करताना ठाकरे म्हणाले होते, "एका बाजूला हे मुस्लिमांना शिव्या देणार, त्यांना देशद्रोही म्हणणार, आणि त्याचवेळी आरएसएसचे मोहन भागवत हे दिल्लीमध्ये मुस्लिम मौलवींची भेट घेणार ही अशी यांची नीती आहे. हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो आम्ही समोर आणू. भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवावे."

हेही वाचा: Mumbai Crime News : मुंबईत रिक्षाचोराचं 'नेटवर्क' ब्रेक! सहा गुन्ह्यांमध्ये हवा असलेला सराईत 'राजू' नवी मुंबईतून जेरबंद; चोरीची रिक्षा हस्तगत

शेअर करा