मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Shirsat : सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचे करण्यात आले अभिनंदन

पनवेल : सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी निर्मल भवन येथे सिडको च्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समवेत एक बैठकीदरम्यान ऐतिहासिक निर्णय पारित केला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Shirsat : सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचे करण्यात आले अभिनंदन

पनवेल : सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी निर्मल भवन येथे सिडको च्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समवेत एक बैठकीदरम्यान ऐतिहासिक निर्णय पारित केला. या निर्णयाच्या अंतर्गत, महाराष्ट्रातील सर्व सिडकोचे घरे फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव एकमताने,बैठकीत मंजूर केला गेला. म्हणजेच आता सिडको परिसरात राहणार्‍या फ्लॅट धारकांना, ट्रान्सफर फी भरण्याची गरज नाही, तसेच कन्वेंस डीड करताना लागणारा सिडको ट्रान्सफर फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. यामुळे सिडको वसाहतील राहणार्‍या नागरिकांना एक मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे.
याच निर्णय बाबत श्री शिरसाट यांनी केलेल्या प्रयत्न व तत्पर कार्यवाही केल्याबाबत शिवसेना पनवेल महानगर संघटक मंगेश रानवडे आणि खारघर शहर संघटक इम्तियाज शेख यांनी वयक्तिक भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन केले. सिडको महामंडळाने पारित केलेल्या प्रस्तावावर, पुढील तीन ते चार दिवसात कॅबिनेट मीटिंगमध्ये, मंजुरी निश्‍चित प्राप्त होण्याची ग्वाही शिरसाट यांनी प्रसार माध्यमांना दिली.

हेही वाचा: Maharashtra Politics : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच नेत्यांमध्ये श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू, काय म्हणाले भाजप-काँग्रेस

शेअर करा