मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : “पंतप्रधान फक्त शपथविधीला जातात!” – संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

पंतप्रधान मोदींनी अजूनही मणिपूरमध्ये पाऊल ठेवले नाही; केवळ मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला जातील" — संजय राऊत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut News

पंतप्रधान मोदींनी अजूनही मणिपूरमध्ये पाऊल ठेवले नाही; केवळ मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला जातील" — संजय राऊत

मुंबई : देशात सध्या गाजत असलेल्या मणिपूरमधील अस्थिरता, काश्मीर दौरे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पण्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.

मणिपूरच्या जमिनीवर पंतप्रधानाचं पाऊल नाही!

"मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, सामान्य जनता भयभीत आहे. पण पंतप्रधान मोदी तिथे गेलेले नाहीत. मात्र नवीन मुख्यमंत्री शपथ घेणार असतील, तर तिथे हजेरी लावतील," असा उपरोधिक टोला राऊतांनी लगावला. त्यांनी केंद्रावर हल्ला चढवत म्हटले की, "भाजपकडे तिथे सरकार स्थापनेसाठी वेळ आहे, पण जनतेच्या वेदना ऐकायला नाही!"

"सरकार घाबरली आहे – जनता नाही!"

गृहमंत्री अमित शहा यांच्या काश्मीर दौर्यावर राऊत म्हणाले, “सरकार डरी हुई है, जनता नहीं. तरीही अमित शहा जर काश्मीरला जात असतील, तर त्यांचं स्वागतच. पण त्यांनी आधी दहशतवाद संपवावा.” या विधानातून त्यांनी केंद्र सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि राजकीय हेतूंवर सवाल उपस्थित केला.

3 हजार कोटींचा घोटाळा? भाजपवर थेट आरोप!

सुप्रीम कोर्टाने नुकत्याच एका प्रकरणात केंद्रावर टीका केली. यावर राऊत म्हणाले, “हा 3 हजार कोटींचा घोटाळा भाजपने केला. एक मोठी इंजिनीअरिंग कंपनी हा करार मिळवणार होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वेळेवर थांबवलं.” त्यांनी न्यायव्यवस्थेचं कौतुक करत म्हटलं, “आजही देशात लोकशाहीचा एक मजबूत स्तंभ न्यायपालिका आहे. त्यांनी भाजपला त्यांची ‘औकात’ दाखवली आहे.”

“शरद पवार हे देशहितासाठी लढणारे नेते आहेत”

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रशंसा केली होती. यावर राऊत म्हणाले, “ही स्तुती स्वच्छ मनाने झाली असं वाटत नाही. पण तरीही शरद पवार हे देशहितासाठी नेहमी झटणारे मोठे नेते आहेत.”

शेअर करा