मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : संजय राऊत यांची भविष्यवाणी सांगितले,विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील?

Sanjay Raut News : संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही 31 जागा जिंकल्या आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut on Sharad Pawar, Chhagan Bhujbal, Ladki Bahin Yojana, संजय राऊत, शरद पवार, छगन भुजबळ, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना

Sanjay Raut News : संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही 31 जागा जिंकल्या आहेत. आम्ही फार कमी फरकाने चार जागा गमावल्या. आता विधानसभा निवडणुकीतही मोठा विजय मिळवू.

मुंबई :- राज्यात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत Vidhan Sabha Election राज्याचे राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) जागांवर मोठा दावा केला आहे.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही 31 जागा जिंकल्या आहेत. आम्ही फार कमी फरकाने चार जागा गमावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी 288 पैकी 280 जागा जिंकणार आहे.

शरद पवार Sharad Pawar हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट आहेत, तर छगन भुजबळ हे फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटातही काम केले आहे, असे मत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी गुरुवारी शरद पवार व भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य करताना व्यक्त केले.पुढे मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत बोलतांना राऊत म्हणाले, "भुजबळ हे अत्यंत मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. रंग, रूप बदलून नाट्य निर्माण करण्यात भुजबळ माहीर आहेत. ते अजित पवारांकडे कसे गेले हे सर्वांना माहित आहे. त्यांच्या जाण्यामुळे राजकारणात कीती मोठा गोंधळ झाला हे सर्वांना माहित आहे. मात्र शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. महाराष्ट्रात फिरता रंगमंच असतो. छगन भुजबळ यांच्यासारखे नेते हे फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत", अशी टीका राऊतांनी केली आहे.

हेही वाचा: Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस आणि शरद गटातील तणाव वाढला, विधानसभेच्या मुंबईच्या या जागांवर दावा

शेअर करा