मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : रवींद्र वायकर लोकसभेत जाऊ शकणार नाहीत, 48 मतांनी विजयी जागेवर संजय राऊतांचा मोठा दावा

•मुंबई उत्तर पश्चिम खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती वाटते.

V
Vivek

2 मिनिट वाचन

Sanjay Raut

•मुंबई उत्तर पश्चिम खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती वाटते.

मुंबई :- लोकसभेच्या उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवरून वाद सुरूच आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाचे नेते नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर लोकसभेत पोहोचणार नाहीत.राऊत म्हणाले, “हे वायकर पूर्वी शिवसेनेत होते. आमच्या पाठिंब्याने ते आमदार झाले, मंत्री झाले, बीएमसीचे स्थायी अध्यक्ष झाले आणि आता ईडी आणि सीबीआयच्या भीतीने ते पळून गेले. आम्ही पळून गेलो नाही, तो आम्हाला ज्ञान का देतोय?संजय राऊत म्हणाले, “आम्ही ईव्हीएमला नव्हे तर यंत्रणेला दोष दिला आहे. वायकर चोरी करून निवडणूक जिंकतात, हा पूर्ण बोगस खेळ आहे. रवींद्र वायकर लोकसभेत जाणार नाहीत.

संजय राऊत याबाबत बोलतांना म्हणाले, "कोणी म्हणत असेल की आमचीच शिवसेना खरी तर त्यांनी स्वतःला आरशात पहावे. लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं तरी तो वाघ होत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे हेच करत आहेत. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, हे शिंदे मिंधे, मधून उपटले कुठून ? हे जे उपटे आहेत, त्यांना यांना भाजपने आणलं", अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

राऊत म्हणाले, "पैशांनी मतं विकत घेणार, वायकरांसारख्या विजयाची चोरी करणं याला जनाधार म्हणत नाहीत. आपला पक्ष महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी-शहांच्या चरणांशी ठेवणं याला जनाधार, विचारधारा म्हणत नाहीत. शिवसेना अशा प्रकारे फोडणं हे मोघलांनंतर महाराष्ट्रावरचे सर्वात मोठे आक्रमण आहे", असा हल्ला राऊतांनी चढवला आहे.

शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त शिंदे गटाकडून मातोश्री परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावरूनही राऊतांनी भाष्य केले आहे. हा एक हास्यास्पद प्रकार आहे. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना असा ठाम पुनरुच्चार राऊतांनी केला. 58 वर्षांपूर्वी हिंदहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची ही शिवसेना मुंबईसह महाराष्ट्रात आणि दिल्लीत निरंतर काम करत आहे.तेव्हापासून माझ्यासारख्या लाखो लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेतला. आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो, तुरूंगवास भोगला. पण आम्ही पक्षाशी ईमान कायम ठेवले", असे राऊत म्हणाले.

हेही वाचा: Samana Agralekh : सामनाच्या वृत्तपत्रातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल, सरकार हे शहरी नक्षलवाद..

शेअर करा