मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका

•नकली सेना आणि नकली पक्ष असलेल्यांनाही स्वतःची भूमिका…..

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis On Sanjay Raut

•नकली सेना आणि नकली पक्ष असलेल्यांनाही स्वतःची भूमिका….. Sanjay Raut

मुंबई :- उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यामिनी जाधव यांचा अर्ज भरण्यापूर्वी स्वतः जाधव दाम्पत्याबाबत विधानसभेत केलेले भाषण ऐकावे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सध्या राज्य गुंडांच्या ताब्यात आहे. हे सर्व संगनमताने सुरू असून याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा हल्लबोलही त्यांनी केला. आज प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

महायुतीकडून दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत यामिनी जाधव आपला अर्ज दाखल करणार आहेत. यवारूनच राऊतांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "फडणवीस आता दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. तिथे जाण्यापूर्वी विधानसभेत त्यांनी स्वतः जाधव दाम्पत्याबाबत केलेले भाषण ऐकावे आणि स्वतःला आरशात बघावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. "नकली सेना आणि नकली पक्ष असलेल्यांनाही स्वतःची भूमिका मांडावी लागते. ते नकली का आहेत. त्यांना असे का करावे लागले, हे स्पष्ट करण्याची गरज आहे. मोदी आमच्याकडे खिडकीतून बघत आहे. त्यामुळे निवडणुकांचे निकाल काय असतील, याची कल्पना येत आहेत. आता त्यांनी कितीही खुणावेले तरीही इंडिया आघाडीतील कोणताही घटक पक्ष जाणार नाही. आम्ही निवडणूक जिंकणार असून इंडिया आघाडीच सत्तेवर येणार आहे", असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

हेही वाचा: Naseem Khan : काँग्रेसला धक्का? नसीम खान यांनी निवडणूक प्रचारापासून दूर केल्याचे कारण समोर आले आहे

शेअर करा