मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : अरे व्वा ,आपण परत यायला पाहिजे, संजय राऊत

Sanjay Raut on Chandrakant Patil: उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील एकमेकांच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर समोर, हस्तांदोलन

V
Vivek

2 मिनिट वाचन

Sanjay Raut : अरे व्वा ,आपण परत यायला पाहिजे, संजय राऊत

Sanjay Raut on Chandrakant Patil: उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील एकमेकांच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर समोर, हस्तांदोलन

मुंबई :- विधानपरिषद निवडणुकीच्या गडबडीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) एकमेकांच्या समोर आले. आपल्या जु्न्या मित्र पक्षातील नेत्याला पाहून संजय राऊत यांची कळी खुलली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचं हसून स्वागत केलं.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी बाकावरील सर्वच महत्त्वाचे नेते व आमदार विधिमंडळात पोहोचलेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही या परिसरात आले होते. ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आपल्या सहकाऱ्यांसोबत उभे असताना तिथे अचानक भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील पोहोचले. या दोन्ही नेत्यांनी यावेळी एकमेकांशी हस्तांदोलन करून संवाद साधला. त्यात राऊत यांनी आपण तर पुन्हा एकत्र आलेच पाहिजे, असे विधान करून एकच खळबळ उडवून दिली. Maharashtra Vidhan Parishad Latest Update

संजय राऊत यांनी यावेळी 'अरे व्वा, आपण परत यायला पाहिजे,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्याशी हस्तांदोलन केलं. चंद्रकांत पाटील यांनीही पुढं येत त्याचा स्विकार केला. 'हे तुमचं वाक्य असेल तर ही लाईन होणार आहे,' असं पाटील यावेळी म्हणाले. त्यावर मी नेहमीच लाईन देतो, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. दोन्ही नेत्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्वांनी हसून दाद दिली. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. Maharashtra Vidhan Parishad Latest Update

संजय राऊत व चंद्रकांत पाटील यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना स्वतः संजय राऊत यांनी आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील आमचे जुने मित्र आहेत. दिल्लीत आम्ही पंतप्रधान मोदींना भेटतो. अमित शहाही आम्हाला भेटतात आणि हातात हात घेतात. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत.

त्यांचे आणि आमचे काही वैयक्तिक भांडण आहे का? हे भांडण राजकीयदेखील नाही. आमचे भांडण वैचारिक आहे आणि ते तसेच राहील, असे संजय राऊत म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे विधिमंडळ परिसरात राजकीय विरोधकांच्या होणाऱ्या भेटीगाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ परिसरातील लिफ्टमध्ये भेट झाली होती. त्याचीही राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झाली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही चॉकलेट देत उद्धव ठाकरेंशी संवाद साधला होती. त्याची खूप चर्चा झाली होती.

हेही वाचा: CM Eknath Shinde : शिंदे सरकारची ज्येष्ठांना भेट, आता सरकारी खर्चाने करता येणार तीर्थयात्रा

शेअर करा