मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut In Jail : खासदार संजय राऊत यांना पंधरा दिवसाचा तुरुंगवास

• मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा, न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut In Jail : खासदार संजय राऊत यांना पंधरा दिवसाचा तुरुंगवास

•मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा, न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया

मुंबई :- माझगाव न्यायालयाने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्याचा निर्णय आज लागला असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना पंधरा दिवसाचा तुरुंगवास सुनावला आहे. तसेच त्यांना 25000 रुपयाचा दंड सुनावण्यात आला आहे. संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात मेधा सोमय्या यांच्या अग्रलेख लिहिला होता.

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. मेधा सोमय्या यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

नेमकं काय प्रकरण आहे?
शिवसेनेचे मुखपत्र सामना ऑनलाइन 12 एप्रिल 2022 रोजी संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखात, "मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर परिसरातील 16 शौचालयांच्या बांधकामाचे कंत्राट घेण्यासाठी राजकीय ताकदीचा वापर केला." या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी 3 कोटी 90 लाख रुपयांचा घोटाळा केला होता.

त्यांचा लेख समोर आल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी शिवसेना खासदाराच्या लेखाबद्दल मेधा सौम्या म्हणाल्या होत्या की, या लेखामुळे मला खूप मानसिक त्रास झाला आहे. यानंतर माझे सर्व नातेवाईक आणि मित्र माझ्याकडे संशयाने पाहू लागले आहेत. ते लोक मला प्रश्न विचारू लागले आहेत.यामुळे समाजात माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली आणि माझी प्रतिमा डागाळली. या लेखानंतर मला लोकांसमोर लाज वाटू लागली. यामुळे माझी बदनामी झाली.

हेही वाचा: Sanjay Raut : 'मैं सिंघम, तू सिंघम…', संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टिका

शेअर करा