मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : 'भ्रष्टाचाराने सत्ता मिळवली तर नेपाळ होणारच', संजय राऊत यांचा शिंदे गटाला इशारा

पोलीस तक्रारीनंतर संजय राऊत आक्रमक; 'शिंदे लोक घाबरले आहेत' म्हणत साधला निशाणा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut

  • पोलीस तक्रारीनंतर संजय राऊत आक्रमक; 'शिंदे लोक घाबरले आहेत' म्हणत साधला निशाणा
  • मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात 'नेपाळसारखी' परिस्थिती निर्माण होऊ शकते असे विधान केल्यानंतर, त्यांच्याविरोधात 'शिंदे गटाने' पोलीस तक्रार दाखल केली. यावर संजय राऊत यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच. ये डर अच्छा है!" अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

    राऊत यांचा 'X' वरील हल्ला

    शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. "मी नेपाळी तरुणांचा लढा भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरुद्ध असल्याचे सांगताच महाराष्ट्रात मिंधे गटाने माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आज हेच मूर्ख लोक पोलीस आयुक्तांना भेटून माझ्यावर कारवाईची मागणी करत आहेत. खुशाल करा अशी मागणी!" असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

    'ये डर अच्छा है!'

    राऊत पुढे म्हणाले की, "हे लोक घाबरले आहेत! भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच, ये डर अच्छा है!" त्यांनी नेपाळच्या तरुणांनी क्रांतीचा मार्ग दाखवला आणि भ्रष्ट शासनकर्त्यांना रस्त्यावर आणले, त्यामुळेच मिंधे लोक घाबरले आहेत, असेही म्हटले.

    हेही वाचा: Navi Mumbai News : कौटुंबिक वादातून सानपाडा पोलिसाची आत्महत्या

    शेअर करा