मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Gaikwad : 'बाळासाहेबां'च्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय गायकवाड यांचा 'यू-टर्न'

•'माझ्या शब्दांचा विपर्यास केला', कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो; आमदार गायकवाडांचे स्पष्टीकरण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Gaikwad : 'बाळासाहेबां'च्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय गायकवाड यांचा 'यू-टर्न'

•'माझ्या शब्दांचा विपर्यास केला', कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो; आमदार गायकवाडांचे स्पष्टीकरण

मुंबई :- महायुतीतील मंत्र्यांविरोधात शिवसेना (उबाठा) गटाने केलेल्या आंदोलनानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. 'उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करता येणार नाही,' असे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) गटाकडून जोरदार टीका झाल्यानंतर आता संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केले आहे.

गायकवाड यांनी आज (12 ऑगस्ट 2025) स्पष्टीकरण देताना म्हटले की, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे." ते म्हणाले, "मी 'उबाठाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही,' असे म्हटले होते. परंतु, माध्यमांनी थेट बाळासाहेबांचे नाव घेतले." बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी, ते सर्वांचे दैवत आणि बाप आहेत, असे सांगत त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

काय म्हणाले होते संजय गायकवाड?

महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावर बोलताना संजय गायकवाड यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. "त्यांना काही काम राहिलेलं नाही. ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही," असे विधान त्यांनी केले होते.

हेही वाचा: Sangli News : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपच्या वाटेवर

शेअर करा