मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sangli News : सांगलीत वाढदिवसाच्या पार्टीत दुहेरी हत्याकांड! दलित महासंघाच्या अध्यक्षांची निर्घृण हत्या; एका आरोपीचाही मृत्यू

•'तुझ्या भावाला जिवंत सोडत नाही' म्हणत पुतण्यावरही वार; जुन्या वादातून 8 जणांच्या टोळक्याचे कृत्य; मृताच्या मुलीचा पोलिसांवर गंभीर आरोप

V
Vivek

2 मिनिट वाचन

Navi Mumbai: Brutal murder of a minor girl!

•'तुझ्या भावाला जिवंत सोडत नाही' म्हणत पुतण्यावरही वार; जुन्या वादातून 8 जणांच्या टोळक्याचे कृत्य; मृताच्या मुलीचा पोलिसांवर गंभीर आरोप

सांगली :- सांगलीतील गारपीर चौकात मंगळवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दलित महासंघ (मोहिते गट) चे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असतानाच, गणेश मोरे याच्या नेतृत्वाखालील आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर निर्घृण हल्ला करून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे, या हल्ल्यात शाहरुख शेख नावाच्या एका आरोपीचाही मृत्यू झाला आहे.

वाढदिवसाच्या कार्यक्रमात हत्याकांड

उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस असल्याने गारपीर चौक परिसरात त्यांच्या घराशेजारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी मित्र आणि नातेवाईकांसाठी जेवण ठेवले होते. याच वेळी गणेश मोरे आणि त्याचे टोळके (यात सतीश लोखंडे, शाहरुख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे आणि समीर ढोले यांचा समावेश होता) कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यांना आत सोडण्यावरून वाद झाला.

उत्तम मोहिते यांचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते (वय 21) याने गणेश मोरे याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्यावेळाने या आठ जणांच्या टोळक्याने चाकू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे आणि काठी घेऊन मोहिते यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी उत्तम मोहिते यांच्या पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात आणि हातावर वार करून त्यांचा खून केला. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पुतण्या योसेफ मोहिते यालाही 'तुला जिवंत ठेवत नाही' असे म्हणत गणेश मोरे याने त्याच्या छातीवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

आरोपीचाही झाला मृत्यू

उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करत असताना आरोपींपैकी शाहरुख शेख याच्या पायाला चाकू लागला आणि मोठी नस कापली गेली. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आज सकाळी त्याचाही मृत्यू झाला.

पोलिसांवर गंभीर आरोप: या घटनेनंतर उत्तम मोहिते यांच्या मुलीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "गणेश मोरे या परिसरात गुंडगिरी करत होता. काल त्याने माझ्या वडिलांची हत्या केल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात माझ्या भावावर (योसेफ मोहिते) देखील हल्ला करण्यात आला. मात्र, त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती," असा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. आरोपी आणि मृतांमध्ये जुने भांडण होते, याच वादातून हा हल्ला करण्यात आला असून, सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : रणधुमाळी सुरू! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

शेअर करा