मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sandipan Bhumare : खासदार भुमरेंच्या चालकाच्या 150 कोटींच्या जमिनीची चौकशी

•महसूलमंत्र्यांनी दिले आदेश; 'बक्षीसपत्र' व्यवहाराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sandipan Bhumare : खासदार भुमरेंच्या चालकाच्या 150 कोटींच्या जमिनीची चौकशी

•महसूलमंत्र्यांनी दिले आदेश; 'बक्षीसपत्र' व्यवहाराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याला बक्षीसपत्र म्हणून मिळालेल्या 150 कोटी रुपयांच्या जमिनीच्या व्यवहाराची आता महसूल विभागाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती देताना, या प्रकरणाची गंभीर तक्रार आल्याने अतिरिक्त मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

संदीपान भुमरे यांचा चालक असलेल्या जावेद रसूल शेख याला हैदराबादमधील सालारजंग कुटुंबातील एका सदस्याकडून छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील 12 एकर जमीन बक्षीसपत्र (हिबानामा) म्हणून मिळाली आहे. रेडी रेकनर दरानुसार या जमिनीची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे. याच प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

परभणीचे वकील मुजाहीद खान यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 'हिबानामा' हा केवळ रक्ताच्या नात्यातील व्यक्तीमध्येच कायदेशीर मानला जातो. मात्र, जावेद रसूल शेख आणि सालारजंग कुटुंबातील सदस्य यांच्यात असे कोणतेही नाते नाही, असे मुजाहीद खान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच, ते दोघे वेगवेगळ्या पंथांचे असल्याने या व्यवहाराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याच प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला आहे. त्यांनी चालक जावेद रसूल शेख याला चौकशीसाठी बोलावून त्याच्याकडून उत्पन्नाचा स्रोत, आयकर रिटर्न आणि ही जमीन कोणत्या आधारावर मिळाली, याची माहिती मागवली आहे. ज्या सालारजंग कुटुंबाने हे बक्षीसपत्र दिले, त्यांच्याकडूनही चौकशीत सहकार्य अपेक्षित आहे, परंतु अद्याप त्यांच्याकडून योग्य माहिती मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात खासदार भुमरे आणि त्यांच्या आमदार मुलाचा सहभाग असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.

हेही वाचा: Harshvardhan Jadhav : पोलीस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी हर्षवर्धन जाधवांना एक वर्षाचा कारावास

शेअर करा