मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik crime: समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी पकडली

Nashik crime : नाशिक - समृद्धी महामार्गावर वाहनांना अडवून मारहाण करत लूटमार करणाऱ्या सराईत टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी पकडली अठ्ठेचाळीस तासात सात जणांना अटक
समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी पकडली अठ्ठेचाळीस तासात सात जणांना अटक

Nashik crime : अठ्ठेचाळीस तासात सात जणांना अटक

Nashik crime : नाशिक - समृद्धी महामार्गावर वाहनांना अडवून मारहाण करत लूटमार करणाऱ्या सराईत टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातून सात संशयित आरोपींना अटक केली असून, आणखी पाच आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.https://maharashtramirror.com/ Nashik News
२७ ऑगस्ट रोजी वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील मळढोण शिवारात ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब मारुती सुझुकी एक्सएल६ कारने मुंबईच्या दिशेने जात असताना आरोपींनी रस्त्यावर लोखंडी वस्तू टाकून वाहन थांबवले.
१८ लाख ९ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटला https://maharashtramirror.com/ Nashik News
वाहन थांबताच सुमारे बारा जणांनी कुटुंबीयांना मारहाण करून त्यांच्या जवळील सुमारे अठरा लाख नऊ हजार नऊशे रुपयांचा ऐवज लुटला. यानंतर इतर वाहनांनाही अडवून चालकांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे तपासात समोर आले. https://maharashtramirror.com/ Nashik News
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींचा माग काढत नाशिक ग्रामीण पोलिसांची पथके धाराशिव जिल्ह्यात पोहोचली आणि विविध ठिकाणी कारवाई करत सात जणांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता समृद्धी महामार्गासह इतर ठिकाणी केलेल्या लूटमार आणि दरोड्यांबाबतही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. या टोळीचे इतर साथीदार तसेच यापूर्वीच्या गुन्ह्यांमधील सहभागाबाबत पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा