मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : 'जागरूक विद्यार्थीच पुढे जाऊन जागरूक आणि जबाबदार नागरिक घडवू शकतो' : वकील महेंद्र दलालकर

Pune News :पुणे: भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, पुणे येथे माहितीचा अधिकार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

जागरूक विद्यार्थीच पुढे जाऊन जागरूक आणि जबाबदार नागरिक घडवू शकतो' : वकील महेंद्र दलालकर ‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ या विषयावर वकील महेंद्र दलालकर यांचे भारती विद्यापीठात मार्गदर्शनपर व्याख्यान
जागरूक विद्यार्थीच पुढे जाऊन जागरूक आणि जबाबदार नागरिक घडवू शकतो' : वकील महेंद्र दलालकर ‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ या विषयावर वकील महेंद्र दलालकर यांचे भारती विद्यापीठात मार्गदर्शनपर व्याख्यान

Pune News : ‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ या विषयावर वकील महेंद्र दलालकर यांचे भारती विद्यापीठात मार्गदर्शनपर व्याख्यान

Pune News :पुणे: भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, पुणे येथे माहितीचा अधिकार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ या विषयावर प्रसिद्ध वकील श्री. महेंद्र दलालकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News

यावेळी महेंद्र दलालकर यांनी माहितीचा अधिकार हा केवळ कायदा नसून नागरिकांच्या सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासनाला चालना मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडून आवश्यक माहिती मिळविण्याचा अधिकार या कायद्याने दिला असून त्याचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अधिकारांविषयी जागरूक राहण्याबरोबरच कायद्याचा समाजहितासाठी सकारात्मक उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.https://maharashtramirror.com/ Pune News

दलालकर यांनी माहिती अधिकाराचा अर्ज करण्याची प्रक्रिया, मागविता येणारी माहिती आणि कायद्याच्या विविध तरतुदी विद्यार्थ्यांना सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितल्या. त्यांच्या संवादात्मक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याचे व्यावहारिक महत्त्व अधिक स्पष्टपणे समजले.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ऋषीकेश देशमुख यांनी आपल्या मनोगतात माहितीचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेला अधिक सक्षम करणारा महत्त्वपूर्ण कायदा असल्याचे सांगितले. “जागरूक विद्यार्थीच पुढे जाऊन जागरूक आणि जबाबदार नागरिक घडवू शकतो,” असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानासोबतच कायदे, अधिकार आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

उपप्राचार्य अमित पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली फाळके यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमन्यू बंगाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. माहितीच्या अधिकारातून जागरूकता, जागरूकतेतून उत्तरदायित्व आणि उत्तरदायित्वातून सक्षम समाज निर्माण होतो, हा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा