मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Roshni Songhare Last Rites : हवाई स्वप्नांचा शेवट… विमान अपघातात ठार झालेल्या रोशनी सोनघरे यांच्यावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार

•Ahmedabad Plane Crash Roshni Songhare Last Rites 'आकाशात झेप घेणाऱ्या' मुलीचा शोकांत प्रवास संपला; नातेवाईकांच्या उपस्थितीत भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Roshni Songhare Last Rites : हवाई स्वप्नांचा शेवट… विमान अपघातात ठार झालेल्या रोशनी सोनघरे यांच्यावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार

•Ahmedabad Plane Crash Roshni Songhare Last Rites 'आकाशात झेप घेणाऱ्या' मुलीचा शोकांत प्रवास संपला; नातेवाईकांच्या उपस्थितीत भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार

डोंबिवली | अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातात मृत्यू झालेल्या डोंबिवलीच्या हवाई सेविका रोशनी राजेंद्र सोनघरे (वय 27) यांच्यावर गुरुवारी सकाळी शहरातील शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कुटुंबीय, नातेवाईकांसह शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

रोशनी सोनघरे गेल्या आठवड्यात अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानात हवाई सेविका म्हणून कार्यरत होत्या. परंतु टेकऑफदरम्यान झालेल्या दुर्घटनेत विमान जळून खाक झाले आणि त्यात रोशनी यांचाही दुर्दैवी अंत झाला. मृतदेह ओळखता येणार नाही इतका जळाल्याने डीएनए चाचणीद्वारेच ओळख पटवावी लागली.

त्यांच्या वडिलांनी आणि भावाने अहमदाबादला जाऊन डीएनए नमुने दिले. चाचणी यशस्वी झाल्यानंतरच बुधवारी मृतदेह ताब्यात देण्यात आला. एअर इंडियाच्या विशेष विमानातून पार्थिव मुंबईत आणण्यात आले आणि गुरुवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी हंबरडा फोडणाऱ्या कुटुंबीयांच्या वेदना पाहून परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले.

रोशनी सोनघरे यांनी कष्टाने शिक्षण घेत हवाई सेविकेपर्यंतचा प्रवास केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विमान अपघातातील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देश हादरला असून, एअर इंडियाकडूनही शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा: Sathaye College : विलेपार्लेच्या साठे कॉलेजमध्ये थरार! इंजिनीयरिंगच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

शेअर करा