मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rohit Pawar : रोहित पवारांचा सरकारला सवाल: 'नवीन आका' कोण, गृहखातं मुसक्या कधी आवळणार?

•पुण्यातून धाराशीवपर्यंत दहशतीची साखळी; पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण.

V
Vivek

1 मिनिट वाचन

MLA Rohit Pawar ED

•पुण्यातून धाराशीवपर्यंत दहशतीची साखळी; पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण.

मुंबई: महाराष्ट्रात राजकीय आश्रयामुळे 'आका' (गुंड) आणि त्यांच्या टोळ्यांची साखळी तयार होत असल्याचा गंभीर आरोप करत आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारलाच धारेवर धरले आहे. पुण्यात दहशत माजवणाऱ्या एका 'आका'ने पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेट धाराशीवपर्यंत आपली मजल मारली असून, त्याच्या टोळीने पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करत धुमाकूळ घातल्याचा आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार रोहित पवारांनी ट्विटद्वारे समोर आणला आहे. त्यांच्या या ट्विटने राज्याच्या राजकारणात आणि गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

बीड आणि सांगलीनंतर धाराशीवमध्ये हा तिसरा 'आका'.

रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, या 'आका'च्या दहशतीमुळे कोणीही तक्रार करायला पुढे येत नाहीये. त्यांनी बीड आणि सांगलीनंतर आता धाराशीवमध्ये तयार होणारा हा तिसरा 'आका' कोण, या 'आका'चा 'आका' कोण, आणि गृहखाते या 'आका'च्या मुसक्या का आवळत नाही, असे थेट प्रश्न विचारले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत, "पोलीस की इज्जत का सवाल है! कधी आवळताय या नवीन आकाच्या मुसक्या?" असा सवाल करत गृहखात्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा: Ajit Pawar : "मी मध्ये आलो तरी 353 लावा!" – हिंजवडीत पहाटे अजित पवारांचा खडसावणारा दौरा

शेअर करा