मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar : "मी मध्ये आलो तरी 353 लावा!" – हिंजवडीत पहाटे अजित पवारांचा खडसावणारा दौरा

•"IT पार्क बाहेर चाललाय… वाटोळं झालंय" म्हणत सरपंचांना फटकारलं; कामांमधील अडथळ्यांवर 353 दाखल करण्याचे आदेश

V
Vivek

1 मिनिट वाचन

NCP List of Maharashtra Assembly Election

•"IT पार्क बाहेर चाललाय… वाटोळं झालंय" म्हणत सरपंचांना फटकारलं; कामांमधील अडथळ्यांवर 353 दाखल करण्याचे आदेश

पुणे | पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (26 जुलै) पहाटेच्या सुमारास हिंजवडी परिसराचा धडाकेबाज दौरा केला. काही आठवड्यांपूर्वी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली का, याची तपासणी करण्यासाठीच हा पाहणी दौरा करण्यात आला. मात्र दौऱ्याचा सूर नेहमीप्रमाणेच थेट आणि खडसावणारा होता.

हिंजवडीमधील वाहतूक कोंडी, अपूर्ण नागरी सुविधा, आणि विकासकामांतील अडथळे पाहून अजित पवार आक्रमक झाले. अधिकाऱ्यांनी "काही जण कामांना आडवे येत आहेत" अशी तक्रार मांडताच त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, "कोणीही मध्ये आलं तर त्याच्यावर 353 लावा, अगदी मी स्वतःही मध्ये आलो तरी लावा!"

यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना थेट सुनावलं. जांभुळकरांनी "धरण करताना मंदिरं जातातच की साहेब, ऐकून घ्या, पण मी माझं करतो" असं म्हटल्यावर अजितदादांचा पारा चढला. त्यांनी संतप्तपणे उत्तर दिलं, "आपलं वाटोळं झालंय! हिंजवडीचं IT पार्क बेंगळुरू-हैदराबादला चाललंय… तुम्हाला काही पडलं नाही?"

अधिकाऱ्यांनी कामांमधील अडथळे आणि काही स्थानिकांच्या विरोधाची माहिती दिल्यावर अजित पवार म्हणाले, "आपलं ठरवून टाका – कामामध्ये कोणी आलं, मग तो कुणीही असो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. समजून सांगा, नाही मानलं तर कारवाई करा!"

त्यांनी पुढे सांगितले की, "दरवेळी 'माझं हे करा, ते करा' म्हणत बसायचं नाही. आपल्याला एकत्रितपणे सगळं काम पूर्ण करायचं आहे."

दरम्यान, हिंजवडीतील रस्ते, वाहतूक, पाणी, आणि मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेत असताना अजित पवारांनी PMRDA व मेट्रो अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा धारेवर धरलं. काही आठवड्यांपूर्वी दिलेल्या सूचना योग्य रीतीने पाळल्या गेल्या नाहीत, हे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दौऱ्याचा निष्कर्ष स्पष्ट होता – हिंजवडीतील कामांमध्ये कुठलीही विलंबशक्ती अजित पवार स्वीकारणार नाहीत. "सुधारणा तातडीनं करा आणि काम पूर्ण करा!" हाच त्यांच्या दौऱ्याचा स्पष्ट संदेश होता.

हेही वाचा: Navi Mumbai MIDC Fire : तुर्भे एमआयडीसीत भीषण आग! 'रेशमा केमिकल्स' कंपनीला आगीचं जबर नुकसान

शेअर करा