मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rohit Pawar : बळी घ्यायचाच निर्णय घेतलाय का सरकारनं? – रोहित पवारांचा संतप्त सवाल

• उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, पण ECG मशीन बंद!

V
Vivek

1 मिनिट वाचन

MLA Rohit Pawar ED

• उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, पण ECG मशीन बंद!

मुंबई | प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असतानाही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारवर गंभीर आरोप करत विचारलं आहे की, “या सरकारला आंदोलकांचा बळी घ्यायचाच आहे का?”

बच्चू कडूंच्या आंदोलनावरून सरकार, विरोधक आणि समविचारी गटांमध्ये टोकाचा संघर्ष

पवार यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त करत सांगितले की, "प्रखर उन्हात सहा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आंदोलकांची प्रकृती ढासळली असताना उपचारासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडे साधे ECG मशीनही चालू नव्हते. ही अतिशय गंभीर बाब असून सरकार डोळे झाकून आणि कानावर हात ठेवून बसले आहे."

दरम्यान, उपोषणाला प्रसिद्धीचे आंदोलन म्हणणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्र्यांवरही टीकेची झोड उठली आहे. विखे पाटील यांच्या "प्रसिद्धीसाठी उपोषण" या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. “जर बच्चू कडूंचं आंदोलन प्रसिद्धीसाठी असेल, तर मग लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंनाही कर्जमुक्तीसाठी उपोषणाला बसवा, शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा राहील,” असा टोला शेट्टी यांनी हाणला.संपूर्ण आंदोलन अधिकच तापलं असून, सरकारच्या संवेदनशून्य भूमिकेवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकींचं रणकंदन सुरू झालं आहे. आता सरकार या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेते का, की आणखी बळीची वाट पाहते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

हेही वाचा: Dombivli Crime News : ऑस्ट्रेलियात नोकरीचे आमिष… निवृत्त वृद्धाची 20 लाखांची फसवणूक

शेअर करा