मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dombivli Crime News : ऑस्ट्रेलियात नोकरीचे आमिष… निवृत्त वृद्धाची 20 लाखांची फसवणूक

• Dombivli Job Scam नऊ वर्षे दिलासा देत ठेवली आशा; शेवटी वृद्धाचा संयम सुटला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dombivli Crime News : ऑस्ट्रेलियात नोकरीचे आमिष… निवृत्त वृद्धाची 20 लाखांची फसवणूक

•Dombivli Job Scam नऊ वर्षे दिलासा देत ठेवली आशा; शेवटी वृद्धाचा संयम सुटला

डोंबिवली | तुमच्या मुलाला ऑस्ट्रेलियात हाय-सॅलरी जॉब लावतो…" अशा गोडगोड आश्वासनांनी डोंबिवलीतील 74 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी हे तक्रारदारांच्या परिचयातीलच असल्याची माहिती समोर आली आहे.

सोमनाथ विसपुते असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव असून, त्यांनी आपल्या मुलाला परदेशात नोकरी मिळेल या आशेने सन 2017 ते 2025 या कालावधीत इरफान पारकर, त्याची पत्नी आणि लियाकत पारकर या तिघांना हप्त्यांमध्ये 20 लाख रुपये दिले. "ह्युमन रिसर्च" नावाच्या कंपनीत नोकरी लावतो, पासपोर्टही आम्ही करून देतो, अशी ग्वाही देत या तिघांनी विश्वास संपादन केला.

शेवटी अनेक वेळा विचारणा करूनही नोकरी तर सोडाच, मुलाचा पासपोर्टही मिळाला नाही. सुरुवातीला वेळकाढूपणा आणि नंतर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विसपुते यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

सध्या डोंबिवली परिसरात तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: Congress Mashal Morcha : विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मशाल मोर्चा स्थगित

शेअर करा