मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Robbery Case: १ कोटींच्या दरोडा प्रकरणात पत्रकार आशिष तिवारी अटकेत

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

robbery case

Robbery Case : बँकेत भरणा करण्यासाठी नेली जाणारी १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रयत्नातील दरोडा प्रकरणात सिंहगड रोडवरील एका पत्रकाराला नर्‍हे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे, महाराष्ट्र मिरर

Crime News : बँकेत भरणा करण्यासाठी नेली जाणारी १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रयत्नातील दरोडा प्रकरणात सिंहगड रोडवरील एका पत्रकाराला नर्‍हे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका महिला पोलिसाने तोतया पत्रकाराला हाताशी धरुन कार अडवत दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला होता. robbery case journalist Police arrested

पत्रकार आशिष तिवारी (वय ३९, रा. कुदळे पाटीलनगर, सिंहगड रोड), पोलीस हवालदार प्रमिला निकम यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, आता या गुन्ह्यात पत्रकाराचाही सहभाग निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

Pune Metro 3 : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला हिरवा सिग्नल; माण ते बालेवाडी मार्गावर प्रवासी सेवा लवकरच

हर्षवर्धन भूषण पवार (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हर्षवर्धन पवार हे १ कोटी रुपयांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी कारमधून जात होते. १८ जुलै २०२६ रोजी दुपारी एक ते दोनच्या सुमारास, सिंहगड रोडवरील ब्रम्हा हॉटेल ते खेड शिवापूर पोलीस चौकी दरम्यान हा प्रकार घडला.

दरोडेखोरांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची कार अडवली आणि १ कोटी रुपयांच्या रोकडने भरलेल्या बड्या हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला होता. robbery case

सीसीटीव्ही फुटेजमुळे बंडाळी उघड

घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले. यामध्ये पत्रकार आशिष तिवारी हा आपल्या दुचाकीवरून दरोडेखोरांच्या पाठोपाठ जाताना दिसून आला. एवढेच नव्हे तर, दरोड्यापूर्वी काही रक्कम त्याच्या दुचाकीमध्ये ठेवण्यात आल्याचेही सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या भक्कम पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या.

RTE : न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय: आरटीई प्रवेशासाठी आईचे जात प्रमाणपत्र ग्राह्य

Pune News : कॅम्पातील MG रोडवर पार्किंगच्या नावाखाली लूट

याप्रकरणात यापूर्वी विक्रम विलास चाकणकर (वय ४४), अमेय अरविंद कार्ले (वय ४६) आणि गणेश रमेश कदम (वय ३३, सर्व रा. धायरी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर दोन साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पत्रकार आशिष तिवारी याला तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांनी अधिक चौकशीसाठी न्यायालयात हजर केले असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नर्‍हे पोलीस करत आहेत. robbery case

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा