Robbery Case: १ कोटींच्या दरोडा प्रकरणात पत्रकार आशिष तिवारी अटकेत
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 मिनट पठन

Robbery Case : बँकेत भरणा करण्यासाठी नेली जाणारी १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रयत्नातील दरोडा प्रकरणात सिंहगड रोडवरील एका पत्रकाराला नर्हे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे, महाराष्ट्र मिरर
Crime News : बँकेत भरणा करण्यासाठी नेली जाणारी १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रयत्नातील दरोडा प्रकरणात सिंहगड रोडवरील एका पत्रकाराला नर्हे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका महिला पोलिसाने तोतया पत्रकाराला हाताशी धरुन कार अडवत दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला होता. robbery case journalist Police arrested

पत्रकार आशिष तिवारी (वय ३९, रा. कुदळे पाटीलनगर, सिंहगड रोड), पोलीस हवालदार प्रमिला निकम यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, आता या गुन्ह्यात पत्रकाराचाही सहभाग निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे.
Pune Metro 3 : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला हिरवा सिग्नल; माण ते बालेवाडी मार्गावर प्रवासी सेवा लवकरच
हर्षवर्धन भूषण पवार (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हर्षवर्धन पवार हे १ कोटी रुपयांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी कारमधून जात होते. १८ जुलै २०२६ रोजी दुपारी एक ते दोनच्या सुमारास, सिंहगड रोडवरील ब्रम्हा हॉटेल ते खेड शिवापूर पोलीस चौकी दरम्यान हा प्रकार घडला.
दरोडेखोरांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची कार अडवली आणि १ कोटी रुपयांच्या रोकडने भरलेल्या बड्या हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला होता. robbery case

सीसीटीव्ही फुटेजमुळे बंडाळी उघड
घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले. यामध्ये पत्रकार आशिष तिवारी हा आपल्या दुचाकीवरून दरोडेखोरांच्या पाठोपाठ जाताना दिसून आला. एवढेच नव्हे तर, दरोड्यापूर्वी काही रक्कम त्याच्या दुचाकीमध्ये ठेवण्यात आल्याचेही सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या भक्कम पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या.
RTE : न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय: आरटीई प्रवेशासाठी आईचे जात प्रमाणपत्र ग्राह्य

Pune News : कॅम्पातील MG रोडवर पार्किंगच्या नावाखाली लूट
याप्रकरणात यापूर्वी विक्रम विलास चाकणकर (वय ४४), अमेय अरविंद कार्ले (वय ४६) आणि गणेश रमेश कदम (वय ३३, सर्व रा. धायरी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर दोन साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पत्रकार आशिष तिवारी याला तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांनी अधिक चौकशीसाठी न्यायालयात हजर केले असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नर्हे पोलीस करत आहेत. robbery case
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
