मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंबईत 'रेड अलर्ट': पालकमंत्री शेलार यांनी घेतला आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा

Ashish Shelar Visit Mumbai Red Aler सीएसएमटी, दादर, कुर्ला स्टेशनसाठी बेस्ट बसेसची व्यवस्था करा; सखल व डोंगराळ भागांवर विशेष लक्ष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ashish Shelar

Ashish Shelar Visit Mumbai Red Alerसीएसएमटी, दादर, कुर्ला स्टेशनसाठी बेस्ट बसेसची व्यवस्था करा; सखल व डोंगराळ भागांवर विशेष लक्ष

मुंबई :- मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या आणि 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सोमवारी शेलार यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील प्रमुख चौकांतील परिस्थिती, शाळा-महाविद्यालये, उपनगरीय रेल्वेची स्थिती, तसेच सखल आणि डोंगराळ भागांमधील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अतिवृष्टीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

रेल्वे आणि बेस्टसाठी विशेष सूचना

पालकमंत्री शेलार यांनी उपनगरीय रेल्वे वाहतूक धीमी असली तरी ती बंद होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर आणि कुर्ला यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढल्यास त्यांच्या सोयीसाठी बेस्ट बसेसची तात्काळ व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यासोबतच, सखल भागांत साचणाऱ्या पाण्यावर लक्ष ठेवून पाण्याचा उपसा वेगाने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेअर करा