मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : बारामती हल्ला प्रकरण;रुबी हॉल क्लिनिकमधून राणा सूर्यवंशी गायब झाल्याचे गूढ काय?

Pune News : *१८ ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळ परिसरात सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली *या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली होती.

VK
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

बारामती हल्ला प्रकरण;रुबी हॉल क्लिनिकमधून राणा सूर्यवंशी गायब झाल्याचे गूढ काय?
बारामती हल्ला प्रकरण;रुबी हॉल क्लिनिकमधून राणा सूर्यवंशी गायब झाल्याचे गूढ काय?

Pune News : पोलीस चौकशीआधीच सूर्यवंशी रुग्णालयातून गायब; रुबी हॉल प्रशासनाची चौकशी होणार का? स्वतःवरील हल्ल्याचा बनाव केल्याचा दावा; सुरक्षा मिळविण्यासाठी कट रचल्याच्या शक्यतेची चौकशी; पोलीस महासंचालकांकडून सुरक्षा मंजुरीची चौकशी करण्याचे आदेश https://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : महत्वाचे मुद्दे


Pune News :*१८ ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळ परिसरात सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली
*या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले
*मात्र, सूर्यवंशी रुग्णालयातून गायब झाल्याने सदर रुग्णालयाच्या भूमिकेमुळे संशयाचे वलय दाट झाले आहे
*सूर्यवंशी यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झाले आहेhttps://maharashtramirror.com/ Pune News

Pune News :पुणे: बारामती विमानतळ परिसरात आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार करणारे राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि उद्योजक राणा सूर्यवंशी हे पोलिसांकडून चौकशी होण्यापूर्वीच पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून निघून गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या बारामतीतील कथित हल्ला प्रकरणाला नवे वळण मिळाले.https://maharashtramirror.com/ Pune News

काही वृत्तांतील दाव्यांनुसार सूर्यवंशी यांनी स्वतःवर हल्ला करण्याचा बनाव रचला होता. व्हीआयपी दर्जाची पोलीस सुरक्षा आणि एस्कॉर्ट वाहन मिळवणे हा त्यांचा हेतू होता. त्यासाठी निमित्त मिळावे म्हणून त्यांनी स्वतःवरच हल्ला घडवून आणला. पुणे ग्रामीण पोलिसांनी तिसऱ्या संशयिताला अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पण या घडामोडीने काही प्रश्न निर्माण केले आहेत. सूर्यवंशी रुग्णालयातून नेमके कोणत्या कारणाने निघून गेले, त्यांनी अधिकृत डिस्चार्ज घेतला होता का आणि त्यांचा सध्याचा ठावठिकाणा काय आहे, याबाबत अधिकृत स्पष्टता आवश्यक आहे. रुबी हॉलच्या व्यवस्थापनाने रुग्ण गायब झाल्याची अधिकृत तक्रार पोलिसांत दिली होती का? की राणा सूर्यवंशीला रुग्णालयातून पलायन करण्यास मदत केली? रुग्णालय व्यवस्थापनाने यावर आजतागायत कोणतेही भाष्य केले नाही? रुबी हॉल प्रशासनाची चौकशी होणार का? या घडामोडीमधील सदर रुग्णालयाच्या भूमिकेमुळे संशयाचे वलय दाट झाले आहे. सूर्यवंशी यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

१८ ऑक्टोबरला झाला होता कथित हल्ला
१८ ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळ परिसरात सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली होती. आपण त्यांचे चाहते असल्याचे सांगत पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने हल्लेखोर जवळ आले आणि त्यानंतर त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न करून धारदार सत्तूराने वार केल्याची तक्रार नोंदविण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन लाखांची सुपारी; आरोपींची साखळी
पोलिसांच्या तपासानुसार, ज्ञानदेव महादेव शिंदे याने दोन लाख रुपये देऊन तरुणांना हल्ला करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. पार्थ अवथळे आणि एका अल्पवयीन मुलावर प्रत्यक्ष हल्लेखोर असल्याचा संशय आहे. स्वप्नील कांबळे आणि चैतन्य बाबर यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली. पुढील तपासात आणखी व्यक्तींचा सहभाग तपासला जात आहे. हल्ल्याच्या नियोजनात मध्यस्थी कोणी केली आणि आर्थिक व्यवहारांची साखळी कुठपर्यंत आहे, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

पोलीस सुरक्षेच्या मंजुरीचीही चौकशी
दरम्यान, सूर्यवंशी यांना यापूर्वी पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली होती. ही सुरक्षा कोणत्या निकषांवर आणि कोणाच्या मंजुरीने देण्यात आली, याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिले होते. या चौकशीची जबाबदारी अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त आहे.

रुग्णालयातून निघून गेल्याच्या वृत्ताने नवे प्रश्न
हल्ल्यानंतर सूर्यवंशी यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. ते रुग्णालयातून पोलिसांच्या पुढील चौकशीपूर्वी निघून गेल्याचे २५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिले होते. त्यांच्या सुरक्षेसंदर्भातही प्रश्न उपस्थित झाले. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या २६ ऑक्टोबरच्या वृत्तानुसार, पोलिसांनी रुग्णालयात असतानाच त्यांचा जबाब नोंदविला होता आणि चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे या घडामोडींबाबत दोन्ही वृत्तांतील तपशील वेगवेगळे आहेत.

गोळीबाराचे गूढ कायम; फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा
या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रत्यक्ष गोळीबार झाला होता का? घटनास्थळी पिस्तूल सापडले असले, तरी काडतुसाची रिकामी पुंगळी मिळालेली नाही. तसेच ताब्यातील संशयितांनी आपल्याकडे पिस्तूल नसल्याचे सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे जप्त केलेले पिस्तूल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा