Pune News : तुमच्याकडे पेपर फुटत आहेत, आमच्याकडे मतं फुटत आहेत!'; MPSC आंदोलनात राज ठाकरेंची केंद्र अन् राज्य सरकारवर जोरदार फटकेबाजी
Pune News :पुणे :- पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
1 मिनिट वाचन

Pune News : 70 हजार पदभरतीचा दावा खोटा; महाराष्ट्रातील नोकऱ्यांवर पहिला अधिकार मराठी मुलांचाच' — राज ठाकरेंचा आक्रमक इशारा
Pune News :पुणे :- पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. "मी इथे तुम्हाला निव्वळ पाठिंबा द्यायला आलो नाही, तर तुमच्या उफाळून आलेल्या रागात सामील व्हायला आलो आहे," अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात करत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर कडक ताशेरे ओढले.https://maharashtramirror.com/ Pune News
'देशात मन की बात सुरू आहे, पण कुणी कुणाचं ऐकत नाही'
विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, "सरकारी फसवणुकीमुळे आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ कसा वाया जातोय, हे माझ्यापेक्षा चांगले कुणी सांगू शकत नाही. तुमच्याकडे पेपर फुटत आहेत, अन् आमच्याकडे मतं फुटत आहेत! पण या सगळ्या प्रकारात तरुणांच्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे निघून जात आहेत. देशात सध्या कुणी कुणाचे ऐकायला तयार नाही, एकाच बाजूने 'मन की बात' सुरू आहे. लोकांना जाती-पातीच्या आणि धार्मिक राजकारणात अडकवून ठेवून शिक्षण, आरोग्य व रोजगारासारख्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे."https://maharashtramirror.com/ Pune News
'70 हजारांची पदभरती हा बनाव; आरक्षण मागत आहात पण सरकारी नोकऱ्या उरल्या कुठे?'
शासनाच्या पदभरतीच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले, "सरकार 70 हजार पदभरती करणार असल्याचे सांगते, पण ती होणार नाही हे उघड सत्य आहे. मुळात सरकारी क्षेत्रातील सर्व गोष्टींचे खासगीकरण केले जात आहे आणि खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. मग तरुण ज्या आरक्षणाची मागणी करत आहेत, त्यासाठी सरकारी नोकऱ्या उरल्या कुठे आहेत? महाराष्ट्रातील जेवढ्या काही नोकऱ्या उपलब्ध असतील, त्यावर पहिला अधिकार केवळ आणि केवळ मराठी मुलांचाच असला पाहिजे."
'निवडणुकीतील दारू-पैशांवरून मतदारांना कानपिचक्या'
राजकीय व्यवस्थेवर प्रहार करताना त्यांनी मतदारांनाही विचार करायला लावला. "निवडणुकीच्या काळात पैसे आणि दारू वाटली जाते, त्यात वाहत जाऊन लोक मतदान करतात. अशातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा गैरसमज जोपर्यंत जनता दूर करत नाही आणि त्यांना धडा शिकवत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही," असा रोखठोक इशाराही राज ठाकरेंनी आंदोलनाच्या व्यासपीठावरून दिला.




