Railway Mega Block : रविवारी मुंबईकरांची लोकल परीक्षा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक!•मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सेवा विस्कळीत राहणार
मुंबई | मुंबईत 20 जुलै, रविवार रोजी रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार असून मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मुख्य मार्गांवर रेल्वे प्रशासनाकडून नियोजित मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
1 मिनिट वाचन
मुंबई | मुंबईत 20 जुलै, रविवार रोजी रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार असून मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मुख्य मार्गांवर रेल्वे प्रशासनाकडून नियोजित मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्ती व देखभाल कामांसाठी हा ब्लॉक असणार असून, या काळात लोकलसेवेच्या वेळापत्रकात मोठे बदल होतील. प्रवाशांनी पूर्वतयारी न करता प्रवास केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मध्य रेल्वेवर स्लो मार्ग बंद, जलद मार्गावर वळवण्यात येणार गाड्या
सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत स्लो मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सीएसएमटीहून निघणाऱ्या सर्व डाऊन स्लो लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
घाटकोपरहून येणाऱ्या अप स्लो लोकलही जलद मार्गावर धावतील.
हार्बर मार्गावर सेवा रद्द, विशेष गाड्यांची व्यवस्था
सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे दरम्यान ब्लॉक घेतला जाणार असून,
डाऊन लाईनवर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40
अप लाईनवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत सेवा बंद राहील.
या काळात वाशी, बेलापूर आणि पनवेलहून वांद्रे/गोरेगावकडे धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
काही प्रमाणात पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष गाड्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर जंबो ब्लॉक; बोरिवली-गोरेगाव मार्गावर सेवा विस्कळीत
बोरिवली ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत अप आणि डाऊन स्लो मार्गांवर जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकदरम्यान स्लो गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.
बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 1 ते 4 वरून कोणत्याही लोकल गाड्या सुटणार नाहीत.
अंधेरी व बोरिवलीहून काही गाड्या फक्त गोरेगावपर्यंतच धावणार आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.यात्रेच्या नियोजनात अनावश्यक खोळंबा टाळण्यासाठी प्रत्येक प्रवाशाने वेळापत्रकात झालेल्या बदलांची नोंद घ्यावी, अशी विनंती रेल्वे विभागाने केली आहे.
हेही वाचा: Raj Thackeray : “हिंदी सक्ती चालणार नाही; दुकानेच नाही तर शाळाही बंद करू” — राज ठाकरेंचा इशारा




