मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : “हिंदी सक्ती चालणार नाही; दुकानेच नाही तर शाळाही बंद करू” — राज ठाकरेंचा इशारा

•मतदारसंघांतून मराठी माणसाला हटवले जातेय, पुढे गुजरातला जोडण्याचा डाव — मिरा रोड सभेत आरोप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray

•मतदारसंघांतून मराठी माणसाला हटवले जातेय, पुढे गुजरातला जोडण्याचा डाव — मिरा रोड सभेत आरोप

मिरा भाईंदर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मिरा रोड येथे घेतलेल्या जाहीर सभेत हिंदी सक्ती, परप्रांतीय प्रभाव आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. "हिंदी सक्ती करून मुंबईवर वर्चस्व मिळवण्याचा सरकारचा डाव आहे, आणि यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खटपट सुरू आहे," असा थेट आरोप त्यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले की, "राज्यात असे मतदारसंघ तयार केले जात आहेत की जिथे परप्रांतीयांचा प्रभाव अधिक असेल. यातून मराठी माणसाला हटवण्याचा कट रचला जात आहे. हे चित्र पुढे जाऊन गुजरातशी जोडण्याच्या प्रयत्नात रूपांतरित होईल."

हिंदी सक्तीला तीव्र विरोध

राज ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, "हिंदीची सक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. सरकारने जर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला, तर केवळ दुकाने नव्हे, शाळाही बंद पाडू."

“मराठी माणूस हा या राज्याचा मालक आहे. आमच्यावर कोणी माज दाखवला, तर ठेचल्याशिवाय राहणार नाही. हे शिवछत्रपतींचं हिंदवी स्वराज्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी मराठी अस्मितेचं समर्थन केलं.

अभिजात दर्ज्याचं दुर्लक्ष आणि निशिकांत दुबेंना प्रत्युत्तर

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही केंद्र सरकारने अद्याप निधी दिलेला नाही, यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “हिंदी भाषेने आजपर्यंत कोणाचे भले केले नाही, उलट इतर अडीचशेहून अधिक मातृभाषांचे नुकसान झाले आहे,” असं म्हणत त्यांनी हिंदीला मिळणाऱ्या प्रोत्साहनावर टीका केली.

नुकत्याच निर्माण झालेल्या मराठी-हिंदी वादावरून भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर उत्तर देताना राज म्हणाले, “मुंबईत येऊन दाखवा”, असं आव्हानच त्यांनी दिलं.

हेही वाचा: Thane Crime News : अंमली पदार्थ विरोधी पथकाची जोरदार धडक

शेअर करा