मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raigad Bribe News : रायगड जिल्हा परिषदेत लाच प्रकरण; शिपाई, कनिष्ठ सहाय्यक व खाजगी इसम रंगेहात अटक

अलिबाग (रायगड) : रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील शिपाई आणि कनिष्ठ सहाय्यक (लेखा) यांच्यासह एका खाजगी इसमाला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dharshiv Anti Corruption Bureau Bribe News

अलिबाग (रायगड) : रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील शिपाई आणि कनिष्ठ सहाय्यक (लेखा) यांच्यासह एका खाजगी इसमाला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) दुपारी अलिबाग येथे करण्यात आली.

अटक आरोपी
१. दिलीप रामचंद्र मावणी (वय ५६ वर्षे) – शिपाई, वित्त विभाग, जि.प. अलिबाग
२. आशिष मदन कांबळे (वय ३६ वर्षे) – कनिष्ठ सहाय्यक (लेखा), वित्त विभाग, जि.प. अलिबाग
३. विलास भिगनणी जेथे (वय २९ वर्षे) – रहिवासी कुरुळ, अलिबाग (खाजगी इसम)

लाचेची मागणी व सापळा
पेण तालुक्यातील सापोली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे शेणे नळ पाणी पुरवठा योजना (जलजीवन मिशन अंतर्गत) या कामाच्या बिल मंजुरीसाठी वित्त विभागातून स्वाक्षरी मिळवून देण्यासाठी आरोपी शिपाई दिलीप मावणी यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ३५ हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर २५ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले.

२२ ऑगस्ट रोजी दुपारी सापळा उभारण्यात आला असता, आरोपी मावणी यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची रक्कम घेतली. त्यानंतर ही रक्कम कनिष्ठ सहाय्यक आशिष कांबळे यांच्याकडे दिली. कांबळे यांनी पैशांची मोजदाद करून ती खाजगी इसम विलास जेथे याच्याकडे दिली. त्यावेळी तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील (एसीबी, ठाणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे, तसेच पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले व पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा: Manoj Jarange On Chitra Wagh : मनोज जरांगे यांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार, म्हणाले ‘तुम्ही तेव्हा कुठे होता?’

शेअर करा